लॉकडाऊन डायरी #20
लॉकडाऊन डायरी #20


प्रिय डायरी,
आज विसावा दिवस. सकाळीच घामाच्या धारा वाहायला लागल्या. रात्री थंडी वाजते नि दिवसा गरम होते. वातावरण सध्या विचित्र आहे पण शुद्ध बनत आहे हेही नसे थोडके! निसर्ग आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे.
दुपारी वाटाण्याचं झक्कास कालवण केलेलं. काय चव होती! अजूनही जिभेवर रेंगाळतेय. त्यानंतर आईने साफसफाई चळवळ हाती घेतली. त्यात जुने फोटो अल्बम भेटले. मग जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
संध्याकाळी व्यायाम झाला आणि गरमागरम उपम्याची प्लेट समोर आली. मग काय मूड खुश! झाडांना पाणी दिलं आणि टीव्ही लावला. तर बातम्या सुरूच.
रात्री पुलाव बनवला. त्याचा घमघमाट पूर्ण घरभर सुटला नि आमच्या तोंडाला पाणी सुटलं. आता पोट तर पूर्ण भरलं आहे. मग आता पाळी विश्रांतीची! तशीही पुस्तक वाचून आता पेंग येऊ लागली आहे.