लॉकडाऊन डायरी #2
लॉकडाऊन डायरी #2
प्रिय डायरी,
आज दुसरा दिवस. आजही दिवसाची सुरुवात उशिरा उठण्यानेच झाली. पण तरीही मस्त मिसळ खायला मिळाली. दिवसभर टीव्ही-मोबाईल-झोप हेच चालू होतं.
माझ्या प्रिय डायरी, कालपासून तुझ्याशी दोस्ती झालीये. मस्त वाटतंय. तुला काय वाटतं, ही माणसाची जी अवस्था झाली आहे त्याला जबाबदार कोण? अर्थात स्वतः माणूसच. मग स्वतःच्या कर्माची फळेही शांतपणे भोगायची नाही हाच माणसाचा हेका दिसतोय.
घरात राहण्याची विनंती असतानाही काहीजण बाहेर अत्यावश्यक कामासाठी नाही तर चकाट्या इतर फिरत आहेत. फोन
, टीव्हीवर वारंवार चीन, इटली, इराण या देशांची काय अवस्था झाली आहे याचेच विडिओ येत आहेत. बातम्यांसाठी टीव्ही लावावा तर कोरोनाविषयक बातम्या. कधीकधी त्याच त्या. एकंदरीत कंटाळवाणं वातावरण.
पण आता तू आहेस. आता निदान तुझ्याशी बोलता येईल. विरंगुळा भेटेल नि मन रमवता येईल. आजच्या दिवसात हायसं वाटणारं असं की नवीन रुग्ण कुठला सापडला, असे कानावर आले नाही आणि कोरोनासंदर्भात उपायही जोरदार चालू आहेत. आता आपल्या हातात आहे फक्त प्रतीक्षा आणि सद्सद्विवेकबुद्धीने वागणे. बाकी आता काही दिवस आपलं भेटणं आहेच!