लॉकडाऊन डायरी #19
लॉकडाऊन डायरी #19
प्रिय डायरी,
आज एकोणिसावा दिवस. सकाळी मस्त ऊन पडले होते. आदल्या दिवशी पाऊस येऊन गेल्यामुळे मातीही ओली होती. आणि सूर्यकिरणे पडून पानांवरचे दवबिंदू चमकत होते. अशा मंगलमय वातावरणात सारा थकवा कुठच्या कुठे पळून गेला.
दुपारी बेसन भाकरीचा बेत होता. पिवळंधम्मक झणझणीत बेसन आणि बाजरीची खमंग भाकरी खाऊन पोट तृप्त झालं. शेरलॉक होल्म्सची पुस्तके माझी आवडती. मोबाईलवर पुस्तक वाचायला घेतलं. रहस्ये उलगडणारा शेरलॉक होल्म्स आणि त्याला पदोपदी साथ देणारा मित्र डॉ. वॉटसन! अंगावर शहारा येतो वाचताना.
रात्री मस्त गाणी ऐकत जेवण झालं. आणि मग गप्पा आणि विचार, संवाद. आता झोपायची वेळ! शुभ रात्री!