लॉकडाऊन डायरी #16
लॉकडाऊन डायरी #16


प्रिय डायरी,
आज सोळावा दिवस. आवरून झालं, नाश्ता झाला आणि आधी मोबाईल हातात घेतला. एका गेमच्या लेव्हल्स पूर्ण केल्या आणि मन भरलं. खूप दिवसांपासून प्रयत्न चालले होते जे आज सफल झाले.
दुपारी टीव्ही वर कॉमेडी कार्यक्रम पाहण्यात वेळ कसा गेला कळलेच नाही. अगदी पोट धरून हसलो. नंतर वैज्ञानिकांवर आधारित माहिती असलेलं पुस्तक वाचलं. अजूनही बरीच पुस्तके आहेत. त्यांच्यावरची धूळही साफ करून वाचून काढावी असे वाटते.
संध्याकाळी छोट्या भुकेसाठी मॅगीने आधार दिला. रात्रीचं जेवणही चविष्ट बनलेलं. आता मात्र डोळ्यांवर झोप येऊ लागली आहे. शुभ रात्री!