लॉकडाऊन डायरी #15
लॉकडाऊन डायरी #15


प्रिय डायरी,
आज पंधरावा दिवस. रोज रोज तेच रुटीन आता सगळ्यांचं झालं आहे. पूर्वी एकसारखं कामाचं रुटीन म्हणून दोष देणारा माणूस आता आरामाच्या रुटीनलाही कंटाळू लागला आहे. परंतु जे काही सुरु आहे ते मानवजातीच्या कल्याणासाठीच आहे.
आज जरा उकाडा कमी वाटत होता. आज हनुमान जयंती. हनुमानासारखं धैर्य सगळ्यांना मिळो आणि सगळ्यांची भीती दूर होवो. आज खीर बनवली होती. खिरीमध्ये जायफळ घातलेले; मग तर झोपच लागली! हल्ली तशीही दुपारी झोपायची सवय झालीच आहे म्हणा! एकदम गर्भश्रीमंत असल्यासारखं वाटू लागलं असेल सर्वांना. खा, प्या आणि झोपा. रात्रीची तर जास्त भूक लागतच नाही. म्हणून पोटापुरते खाल्ले. आता पुन्हा तेच! झोप! शुभ रात्री माझ्या प्रिय डायरी!