लॉकडाऊन डायरी #13
लॉकडाऊन डायरी #13


प्रिय डायरी,
आज तेरावा दिवस. मस्त गाढ झोपेतून आज आईने उठवले. फ्रेश होऊन चहा घेतला. तेवढ्यात नाश्ता तयार होताच. अंघोळीला आज टांग देऊ म्हटलं; पण स्वच्छता राखण महत्त्वाचं!
दुपारी अळूच्या वड्यांनी रंगत आणली. नंतर समाज माध्यमांवरचे विडिओ पाहिले. काल दिवे लावायला सांगितले होते पण काहींनी तर कॅण्डल मार्च काढला! पालथ्या घड्यावर पाणी!
खूप वेळ आहे सध्या. अगदी निवांत. एखादी नवीन भाषा शिकावी असे वाटते. आणि सोबतीला अभ्यास आहेच. काही चांगल्या सवयी रुजवण्याच्या प्रयत्नात आहे. जसे कि, लवकर उठणे, काहीतरी नवीन शिकणे, इत्यादी.
शेवग्याच्या शेंगांनी रात्रीच्या जेवणाला बहार आणली. आज दुपारी झोपही नाही झाली. पण आता डोळे पेंगत आहेत. तर माझ्या प्रिय डायरी, चल भेटू उद्या!