pooja thube

Others

2  

pooja thube

Others

लॉकडाऊन डायरी #12

लॉकडाऊन डायरी #12

1 min
223


         आज बारावा दिवस. आज गाणी ऐकत ऐकतच जाग आली. कोवळं ऊन पडलं होतं. पण बाहेर फिरता येणार नव्हतं. मग काय बेडवरूनच पाहून घेतलं. मी लावलेल्या बिया आता उगवू लागल्या आहेत. त्यांना पाणी दिलं.

दुपारी बातम्या पाहता पाहता जेवण सुरु होतं. कोरोनाग्रस्तांच्या आकड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. आणि ही बाब खूप चिंताजनक आहे. सर्वांनी देश वाचवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. 

आईने आज मिरची पावडर तयार करण्यासाठी मिरच्या दळल्या. त्याचा ठसका घरभर उठला. मग काय, बाहेरही जात येईना आणि घरातही थांबवेना अशी गत झाली.

आज रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी दीप प्रज्वलन करावे असे आवाहन करण्यात आले होते. आम्हीही त्यात सहभागी झालो. सर्वांनी अंधकारातून प्रकाशाकडे जावे अशी प्रेरणा त्यामागे आहे. 

रात्रीच जेवण झालं आहे. शतपावलीही झाली. आता झोपेच्या अधीन व्हावे असे वाटते. माझ्या प्रिय डायरी, शुभ रात्री!


Rate this content
Log in