लॉकडाऊन डायरी #11
लॉकडाऊन डायरी #11


प्रिय डायरी,
आज अकरावा दिवस. आज लवकर जाग आली. उठून आवरायला मात्र वेळच लावला मी. उगाच टाइमपास केला. आज मला कोणी म्हणणार नव्हतं की सदा बेडवर पडून असतेस कारण, आज आईने गाडीला ऊन देण्यासाठी बाहेर टाकलेलं आणि त्यामुळे मला काही बेडवर बसता आले नाही!
दुपारी मस्त वरणातल्या चकल्या केलेल्या. टीव्ही पाहता पाहता जेवण झालं. आज खूपच गरम होत होते. लिंबूपाणी पिऊया म्हटलं. मग काय लिंबू, साखर, मीठ, मध आणि पाणी एकत्र केलं आणि झक्कास लिंबूपाण्याने जिभेचे चोचले पुरवले.
संध्याकाळी चहा घेतला. हल्ली भाजीवाले दारोदार येतात. भाजीची गाडी आली आणि आई-आत्याची गडबड सुरु झाली. योग्य अंतर ठेवूनच भाजी घेतली. आणि रात्रीचा बेत ठरला. ताजी ताजी भाजी संध्याकाळी मिळेल असं तर कधी वाटलं नव्हतं! आता पोट तर भरलं आहेच. चल तर मग माझ्या प्रिय डायरी,
शुभ रात्री!