pooja thube

Others

3  

pooja thube

Others

लॉकडाऊन डायरी #10

लॉकडाऊन डायरी #10

1 min
317


प्रिय डायरी,

         आज दहावा दिवस. आजची सकाळ प्रसन्न वाटत होती. माझा नाश्ता आज मीच बनवला. आईने सकाळीच साफसफाईला सुरुवात केली.मला धुळीची अलर्जी. त्यामुळे ते एक कारण बनतं आणि कामातून सुटका होते!


दुपारी फारशी भूक नव्हतीच. म्हणून थोडंसं खाल्लं. नंतर मस्त कलिंगडाचा बेत होता. गोड आणि रसदार कलिंगडाने मूड चांगला बनवला.

संध्याकाळी मात्र भूक लागलेली. त्यात व्यायाम केला आणि भूक चांगलीच खवळली. मग फोडणीची पोळी बनवली आईने. त्याच मी दुपारी न खाल्लेल्या चपात्यांपासून! अन्न वाया घालवू नये. अभ्यासाला सुरुवात करावी असा वाटतंय. परीक्षा होण्याची शक्यता आहेच! चांगला अभ्यास होण्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. आणि आता मी पण तेच अवलंबण्याच्या विचारात आहे. माझ्या प्रिय डायरी, चल शुभ रात्री!


Rate this content
Log in