Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

SHUBHAM GHUDE

Others


4.5  

SHUBHAM GHUDE

Others


लॉक डाऊन दिवस-9

लॉक डाऊन दिवस-9

1 min 287 1 min 287

आज अचानक सकाळी लवकरच जाग आली, त्याला कारण सुद्धा त्या पद्धतीचेच होते. कारण आता त्या विषाणूने मुंबईमध्ये लाखोंची का करोडोंची वस्ती असलेल्या या नगरीमध्ये प्रत्येक जण आपले स्वप्न घेऊन या नगरीत येत असतो, त्या नगरीमध्ये त्याने त्याचे विश्व खूप मोठ्या पद्धतीने निर्माण केले होते. दिवस 9वा असला तरी त्याचा परिणाम फार भयंकर पद्धतीने त्यावर जाणवत होता. महानगरपालिकेचे कर्मचारी खूप मोठ्या या साह्शी पद्धतीने विविध उपाययोजना राखून त्याला काटेकोर पद्धतीने सामना करत होते.

आता सर्व मुंबईमध्ये भीतीचे वातावरण खूप खूप मोठ्या प्रमाणात पसरत होतं. सर्व देश अशा भयंकर परिस्थिती त्या विषयांवर औषध शोधण्यात आपले सर्वस्व प्रयत्न करत होते. पण त्यांना अजून पाहिजे तसं यश मिळत नव्हतं. त्यामुळेच या देशांमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचा प्रत्येक माणसाने, आता खरंच विचार करण्याची गरज होती.

जर आपण थोडं स सय्यम राखलं तर आपण पण नक्कीच त्याला हरवू शकत होतो आणि हरवणारेच आहेत. खरं तर आता मुंबईमध्ये खूप सारी ठिकाण आता संपूर्ण लॉक डाऊन करण्याची वेळ आपल्या बेफिकीर वागण्यामुळेच आले होती.........


Rate this content
Log in