लॉक डाऊन दिवस-8
लॉक डाऊन दिवस-8


सध्याची स्थिती पाहायचीत झाली तर, दिवसंदिवस आपण त्या विषाणूच्या जाळ्यामध्ये भक्कम पणे, त्याचे अस्तित्व निर्माण करण्यास आपण त्याला जणू एक प्रकारे खूप मोठे मदत करत होतो आणि आपली चुकी होती त्याचा हा वाढलेला विस्तार आता दिवसंदिवस वाढत चालला होता होता.
असे सर्व घडत असताना, आता गाव पातळीवर सुद्धा या विषाणूच अस्तित्व तयार होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जर अशी परिस्थिती उद्भवली तर देशावर फार मोठा असं भयानक संकट उभे राहील. जी परिस्थिती बाहेर जगातील दुसऱ्या देशांवर उद्भवली होती त्यापेक्षा भयंकर परिस्थिती आपल्याकडे येईल.
याचं सर्व गांभीर्य लक्षात घेऊन सरकार, सरकारी कर्मचारी, तसेच पोलीस बांधव त्यांच्या परीने सर्व काय करता येईल ते करत होते. आणि मला त्या गोष्टीचा अभिमान सुद्धा वाटतो की त्या खेड्यापाड्यांमध्ये, वाड्या-वस्त्या मधले अशिक्षित असे गावकरी पण ते शासनांच्या नियमांचं पालन अतिशय योग्य रीतीने तसेच त्या पद्धतीची खबरदारी घेत होते. त्यामुळे अतिशय अशा भयानक विषाणू ला त्याच्या अस्तित्व निर्माण करता येत नव्हते. पण मला एक गोष्ट समजत नव्हती ते सर्वजण अशिक्षित असून सुद्धा अतिशय योग्य पद्धतीने सरकारला मदत करत होते तर दुसरीकडे शहरांमधील लोक जत्रा भरल्यासारखे मार्केटमध्ये फिरत असत आत्ता मला समजत नव्हते यामध्ये शिक्षित कोण आणि अशिक्षित कोण.........