लॉक डाऊन दिवस-4
लॉक डाऊन दिवस-4
दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आवरून झाल्यावर,काल अतिशय उत्साही करून टाकणारी जणू घटना माझ्या आयुष्यात घडलेली. जास्त वेळ वाया न दवडता, मी पेटीची किल्ली हातात घेतली आणि अतिशय अशा एका वेगळ्याच विश्वा मध्येच भारावून गेलं असं जाणवत होतं.
अखेर तो क्षण आला, मी ती पेटी उघडली त्यामध्ये असंख्य अशा वस्तू होत्या. त्यामध्ये माझ्या लहानपणीच्या खेळणी ,पुस्तक, अलंकारी वस्तू , हस्तकलेच्या वस्तू ,जत्रे मधून आणलेल्या वस्तू ,तसेच विविध वृत्तपत्रातून गोळा केलेले अनेक असे लेख , कथा, त्याचप्रमाणे विविध अशा वस्तू होत्या.
खरंतर त्यामध्ये फारच अशा गुप्त आठवणी दडलेल्या होत्या. सहजच माझं लक्ष, एका त्यामधील एका वही कडे गेले. आणि पाहताक्षणीच मन अगदी त्या शाळेतल्या गोंड दिवसांमध्ये हरून गेले. काय होते ते दिवस, काय होत्या त्या गोष्टी, काय होती ती मैत्री खरंच एक अनोखी जग होतं .परत त्या जगामध्ये जाण्याचं योग येणार नव्हतं.
खरंतर ति वही माझ्या दुसरी-तिसरीच्या वर्गांमधील असावी. अतिशय आशा त्या भाबड्या मनाने त्या वहीमध्ये विविध खेळाडूंचे तसेच विविध कथा लेख अशा खुप सार्या गोष्टी विविध माध्यमांच्या गोळा करून, त्या वहीमध्ये जणू एक प्रकारचा त्यांचा साठाच केला होता.
अशा त्या विविध आठवणींमध्ये, एकामागून एक गोष्ट बघत असताना, अतिशय रमणीय अविस्मरणीय अशा अनेक क्षण त्यामुळे पुन्हा एकदा या जीवनामध्ये घर करू लागले आणि त्या विविध अशा आठवणी मध्ये रमताना दिवस कसा गेलं ते समजलं नाही.............