लॉक डाऊन दिवस - २
लॉक डाऊन दिवस - २
काल रात्री, असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधताना फारच रात्र झाली डोळा लागण्यासाठी. सकाळी उशीर झाला मग उठण्यासाठी. सर्वकाही सकाळचं आठपूण झाल्यानंतर सहज आज चहा पीत असताना मनामध्ये विचार आला आणि दूरदर्शन चालू केलं. तर पाहताक्षणीच अनपेक्षित असे चित्र समोर यायला लागल. सर्व दूरदर्शन वाहिन्यांवर सर्व घड्याळ त्या भयानक आशा विषाणूबद्दल बातम्या येत होत्या. खरंच आपल्या निष्काळजीपणामुळे आता त्या विषाणूने त्याचे जग अस्तित्व स्थापन करायला पूर्णपणे पहिल्या पायरीला अशा पद्धतीने वाटचाल करण्यास तो पूर्णपणे यशस्वी ठरला होता.
असं सर्व पाहत असताना, अचानक माझे लक्ष अनेक वर्षांपासून इतक्या निवांत अशा एका कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या पेटीकडे गेले. गेल्याबरोबरच माझे मन त्या विश्वामध्ये भारावून जात होते कारण अनेक अशा लहानपणीच्या आठवणीने त्यामध्ये जणू घरच करून बसले होते. मी सावकाश एक एक पाऊल त्या दिशेने टाकत चाललो होतो. मनामध्ये एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. आतापर्यंत अशी कधी वेळच जणू कधी भेटलीच नव्हती. अखेर माझ्या स्वप्नांचा राखरांगोळी झाली पाहताक्षणीच त्या भेटीला कुलूप दिसले. असे सर्व काही घडत असताना सूर्य माथ्यावर कधी आला हे समजतच नाही. पोटामध्ये जणू एक प्रकारे कावळे बोंबलत होते असे जाणू लागल्यावर मी थेट स्वयंपाकगृहात धाव घेतली. जसं लहान तान्हा आईच्या कुशीमध्ये धाव घेतात त्याप्रमाणे.
जेवणामध्ये काय करावे समजतच नव्हतं, अचानक बाजूच्या मित्राने आवाज दिला. भाऊ ये जेवायला. तेव्हा ते शब्द ऐकून मनातून फारच आनंद झाला. जेवता जेवता सहज बोलणं होत गेलं खूप साऱ्या गोष्टी तो मला त्याच्याबद्दल सांगत होता. ज्या पद्धतीने दोघांमध्ये संभाषण चालू होतं. दोघं त्यामध्ये एवढे हरवून गेलो समजलंच नाही. अचानक पावर ऑफ झालं. सगळीकडे काळाकुट्ट असा अंधार पसरला होता. जणू सर्व जगंच एका जागी ठप्प झालं होतं. मोबाईल हातातच होता मोबाइलची टॉर्च चालू केली. खिडकीतून बाहेर बघितलं तर सर्व रस्ता सामसूम जाणवत होता. सर्व सृष्टीमध्ये जणू अंधारच पसरत चालला होता...