लॉक डाऊन दिवस-१२
लॉक डाऊन दिवस-१२
लॉक डाऊन चे बघता बघता अकरा दिवस पूर्ण झाले. पण ते अकरा दिवसांमध्ये खूप काही न दिसणाऱ्या, पण अतिशय हेवा वाटणाऱ्या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्र नाहीच तर सर्व भारत देशामध्ये अनुभवास मिळत होत्या.
भारत देश हा असा एकमेव होता, या देशाची लोकसंख्या सर्व दुनिया मध्ये सर्वात जास्त असून सुद्धा त्या विषाणूला भारत देश अतिशय अशा योग्य पद्धतीने उत्तर देत होता.
खरंच ही परिस्थिती उद्भवल्यास मुळे, अनेक आशा हातावर काम करणाऱ्या लोकांचे खूप हाल होत होते. अशी अनेक संकट एकामागून एक उद्भवत होती.
पण भारत देशामध्ये सर्
वांमध्ये माणुसकी, आपुलकीची भावना प्रत्येकाच्या हृदयात वास करून आहे. प्रत्येकाला देशाची काळजी आहे अशा भावनेतून किती लोक अशा ज्या लोकांना मदतीची गरज आहे अशा लोकांसाठी पुढे येत होते. खरंच देशातील एक एक व्यक्ती आपल्या परीने आपल्या देशासाठी जे जे करता येईल ते पूर्ण जिद्दीने शांततेने आणि सरकारने घालून दिलेले नियम पाळून करत होते. सर्व पाहत असताना जगामध्ये विविध क्षेत्रात, सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात आहे पण त्या पद्धतीने आपल्या देशामध्ये खूप कमी. तरीसुद्धा जगाला हेवा वाटावा असं कार्य आपला भारत देश करून दाखवत होता.