लॉक डाऊन दिवस-10
लॉक डाऊन दिवस-10


पाहता पाहता लॉकडाऊनचे नऊ दिवस कसे गेले हे समजलेच नाही. एक महाराष्ट्रसाठी तसेच भारत देशासाठी एक चांगली बातमी होती, त्या भयंकर विषाणूने त्रस्त झालेले लोक अगदी ठणठणीत बरे होते. तर दुसरीकडे काळजी वाढवणारी बाब म्हणजे रुग्णांची संख्या दुसरीकडे झपाट्याने वाढत चालली होती. अशा परिस्थितीमध्ये भारत देशावर तसेच सर्व राज्यांवर भयानक अशी स्थिती उद्भवली होती विशेषता त्यामध्ये महाराष्ट्र सर्वांमध्ये अव्वल क्रमांकावर होता कारण महाराष्ट्राची शान म्हणजे मुंबई तसेच पुणे या शहरांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली होती. शासन दिवसंदिवस अनेक अशा उपाययोजना राबवत होता जनतेकडून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना प्रतिसाद मिळत होता.
पण काय समाजकंटक तसेच विनाकारण कामधंदे नसताना फिरत असल्यामुळे, सर्व एकत्र येत असल्यामुळे प्रशासनाला खूप खूप अडचणीला सामोरे जावे लागत होते. आता अशा सर्वांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने सुरुवात केली आणि ते योग्यच निर्णय होता कारण सध्याच्या परिस्थितीचा आढावा बघता ते गरजेचं होतं.
तरीसुद्धा विनाकारण लोकांची गर्दी भाजीपाला, घेण्यासाठी खूप प्रमाणात होत होती. खरंतर ही फार भयानक बाब होती, तरीसुद्धा लोक या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नव्हते .शासन आपल्यापर्यंत सर्वकाही करत होते .आपले सुद्धा देशाचे नागरिक म्हणून काहीतरी कर्तव्य आहे हे कधी समजेल लोकांना ते काही कळतच नव्हते...