लॉक डाऊन दिवस- १
लॉक डाऊन दिवस- १


सकाळी लवकरच जाग आली. सहज घड्याळाकडे पाहतोच, तर सकाळचे पाच वाजले होते. मनामध्ये खूप सारे प्रश्न, सध्या उद्भवलेल्या परिस्थिती बद्दल येत होते. तर शांत झोपच कशी लागणार. कारण परिस्थितीमुळेच पूर्ण देश लॉकडाऊनची पहिलीच वेळ होती. पहिल्यांदाच असं काही आपल्या देशामध्ये उद्भवले होतं. संपूर्ण जगाची स्थिती बघितली तर, अतिशय योग्य निर्णय होता.
खरं शत्रू दिसतच नव्हता. पण तो फार वेगवान पद्धतीने त्याची सृष्टी निर्माण करत होता. जगामध्ये खूप साऱ्या देशांमध्ये त्यांनी त्याचे अस्तित्व निर्माण केले होते. ती स्थिती आपल्या देशामध्ये त्याने कणाकणाने निर्माण करण्यासाठी सुरुवात केली होती. शिक्षणाच्या निमित्ताने मी मुंबईमध्ये होतो. आई-वडील, सर्व नातेवाईक गावीच होते. माझे मन सुद्धा गावाच्या दिशेने पळत होते. असे मनामध्ये असंख्य प्रश्न येत असताना मी पुन्हा कधी झोपी गेलो ते समजले नाही. अचानक खिडकीमधून सूर्याची किरणं डोळ्यांवर आली. अशी अचानक जाग आली.
लॉकडाऊन असल्यामुळे सर्व काही बंद होते, फक्त अत्यावश्यक सेवा चालू होत्या. मीच माझा सकाळचा नाष्टा केला ते करत असताना खूप काही नवीन अनुभव आले. खरंतर बाहेरच जेवणाची सवय असल्यामुळे रूमवर काय राहीलच नव्हतं. दुपारचं जेवण करण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून, तोंडाला मार्क्स लावून, सोशल डिस्टन्स सिंग पालन करून मार्केटमधून एक आठवड्याचे सामान घेऊन आलो.
आधीच लॉकडाऊनमुळे कॉलेजला सुट्टी मिळाली होती. आता एकवीस दिवस कसे जाणार हे समजतच नव्हतं. असे सर्व करत असताना दिवस कसा निघून , गेला हे समजलं नाही...