STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Others

2  

Anjali Bhalshankar

Others

लोक काय म्हणतील????

लोक काय म्हणतील????

2 mins
55

बर्याच समुह व कुटुंब यामध्ये लोक काय म्हणतील ? हा मोठाच महत्वाचा प्रश्न आपल्याकडे कटाक्षानं उपस्थित केला जातो. परंतु प्रत्येकाने आपण कोणत्या मार्गावर कुणासोबत वा एकट्याने कोणत्या पदधतीने भ्रमण करावे हे ज्याचे त्याने ठरवावे. वा अनुभवाने शिकत जावे. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर आपले जन्मदाते सुद्धा आपल्याला हक्क व अधिकारात गुंतवत नाहीत मात्र आपल्या कर्तव्य व प्रेम यात कसुर करीत नाहीत मग दुसर्या कुणा व्यक्तीने आपल्यावरील स्वामित्वाची मग्रूर भाषा करावी हि प्रेमाची अवगणनाच म्हणावी लागेल. मनाने दुर्बल होण्याचे कींवा खचून जावे असे अनेक प्रसंग जीवनात अनेकदा येतात आपल दुःख वेदना भावना ओघळणारे अश्रु दाखवताना चारचौघात कींवा मग एकाद्या विशिष्ट व्यक्तीसमोर वाच्यता करताना कोणाच्या मनात आपल्याविषयी अद्वैत भावना आहे हे ओळखणे अवघडच पंरतु तरीही आपले अश्रू मातीमोल आहेत की अनमोल अशी नजर ओळखता यायला हवी.आपल्या अश्रूंचे मोल खरंतर स्वताला समजायला हवे. शिंपल्यातील मोत्या प्रमाने आपण अश्रू जपायला हवे बंदिस्त करून जपायलाच हवे. आपली परकं तुझ माझं आपुलकी द्वेष मत्सर चांगले वा वाईट खरे खोटे चेहेरे व मुखवटे लोकांनी वेळोवेळी दाखवून दिलेले असतात त्यामुळेच मुखवटयांना न भुलणयाचे कसब यायलाच हवे. आपण एकटे रहातो तेव्हा तर नककीच आपल्या जगण्याची चौकट व मर्यादा नककी करणेच योग्य नाही का? ज्यात कोणाला कीती प्रमाणात स्थान द्यायचे वा कोणाचे बोट धरून कुठवर पुढे जायचे हे नक्की करायलाच हवे ना! दुःखाचा हळवेपणाने सक्षमतेवर मात करता कामा नये. आयुष्य मोठ आहे समुद्रासारख खोल नि आभाळाइतक वा त्याहुन पुढेच व्यापक विचारांच सामर्थ्य असणारा मेंदू आपल्याकडे आहे. अशा ऊतुंग हदयात जगताना वाट्याला आलेले संचित सांभाळून ठेवणे कठीण आहे काय? शेवटचे जाणे एकटयाचेच की! पंचमहाभुतातुन झालेली निर्मिती एक दिवस माझ्या अस्तित्वाच्या सजिव खुणा पुसुन टाकेल मलाही विलीन व्हावेच लागेल सृष्टीच्या जन्म मृत्यूच्या अलिखित निर्विवाद सत्याला सामोरे जावेच लागेल मग आता वाट्याला आलेला क्षण न क्षण कवेत घयायलाच हवा ना !

ऊद्याचे माहीत नाही पंरतु आज आता या क्षणाचा सोहळा व्हायला हवा मग वाट्याला आलेले कडवे घोट पचविणे अवघड नाही कारण काही दुःख नियतीनेच आपल्या पदरात टाकलेली असली तरी बरीचशी आपल्या कर्माने पेरलेली असतात यात शंकाच नाही कारण सुख दुःखाच्या व्याख्या व्यक्ती सापेक्ष बदलत असतात.महणूनच जीवनाला गती प्रगती हवी तशीच थांबणे माघार घेणे इ.ची मर्यादाही गरजेची आहे की जेणेकरून लोक काय म्हणतील यासारखा विचार अंश मात्र ही मनाला शिवणार नाही.


Rate this content
Log in