लग्नाचे वय
लग्नाचे वय
लग्न हे एकाच नाही तर दोन कुटूंबातील सदस्यांचे बहुप्रतीक्षित असे आवडते स्वप्न. एवढेच काय समाजातील हितचिंतकांनीही या लग्नात रस असतो. कुणाचेही भलं होवो. संसार सुरू होवो. ते सुखात राहो , नांदो हीच काय ती भावना. मग काय अनेक वरिष्ठ सल्ले देतात की, आता आपला काळ गेला.
आता लग्न अवघड झालीत.मग मुलांचे असू द्या किंवा मुलींचे. समाजात आहेच ती भावना . कारणे अनेक आहेत. मग मुलामुलींचे वाढते शिक्षणाचे प्रमाण. .... साथीदार विषयीच्या अपेक्षा. .... नोकरीत नसलेली स्थिरता. ....
कुठे किती काळ राहणार याचा भरवसा नाही.उभयतांच्या वाढलेल्या अपेक्षा अशी एक ना अनेक कारणे म्हणूनच तेव्हा काय ते लवकर ठरवा असे अनेक प्रेमळ सल्ले सुरू. पण असे घरच्यांनी, बाहेरच्यांनी घेरल्ल्या वरही आमचा नायक मात्र शांतच. घरच्याशी या विषयावर काही बोलेच ना.....!
मग हितचिंतक म्हणू लागले की बघितली असेल एखादी परी. खरच या राजबिंड नायकाच्या मनात कोणी आहे का❓हा कुणाच्या प्रेमात तर पडला नाही ना. कोणी मोहीनी तर घातली नाही ना. याला कोण असेल तर अप्सरा. अशा सर्वदूर चर्चा ऐकू येतात.....
