लग्न
लग्न
रावणाला मुलगी ज्ञानी होती. मुलीला पाहून रावण खूप आनंदीत झाला होता. मग रावणाने बृम्हदेवाला विचारले की या माझ्या मुलीचे लग्न कोणासोबत होईल? यावर बृम्हदेवाने कुंडली पाहून सांगतो म्हणून ते कुंडली पाहू लागले. आणि सांगितले की, 'ते पहा समोर बसलेला झाडूवाला मुलगा आहे ना त्याच्याबरोबर तुमच्या मुलीचे लग्न होईल'.
रावणास भरपूर राग आला. व रागाने लाल झाला. आणि म्हणाला, 'माझी मुलगी या झाडूवाल्या मुलाला द्यायची? शक्यच नाही! म्हणून रावणाने त्याच्या नोकरांना सांगितले की या मुलाला उचला आणि समुद्रात फेकून द्या'. नोकरांनी त्याला पकडले आणि त्याच्या एका पायाचा अंगठा तोडला. आणि समुद्रात फेकून दिले. तो मुलगा वाहत-वाहत एका बेटावर पोहचला. त्या बेटावरचे राजा आजारी पडून वारला होता. त्या बेटाला राजा नव्हता.
सारे लोक चिंतेत होते. तेव्हा एका ऋषीने सांगितले की आपल्या हत्तीच्या सोंडेत माळ द्या. हत्ती कोणाच्या गळ्यात माळा घालील तो आपल्या बेटाचा राजा होईल. हत्ती आपल्या सोंडेत माळ घेऊन फिरत होता. हत्ती च्या सोंडेत माळ देऊन तेथील लोक हत्ती च्या मागे-मागे फिरत होते. इकडे हा मुलगा वाहत-वाहत त्या बेटावर पोहचला. हत्तीने त्या मुलाला पाहील्या बरोबर आपल्या सोंडेतील माळ त्या मुलाच्या गळयात घातला. तेथील लोक आनंदीत झाले.
आपल्या बेटाला राजा मिळाला म्हणून. लोकांनी त्यास आपल्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले. तो मुलगा राजा म्हणून राज्य पाहू लागला. हळूहळू तो राजा मोठा होऊ लागला. वयात आला होता. इकडे रावणाची मुलगी उपवर झाली होती. बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या राजा झालेल्या मुलाशी लावून दिला. रावणाने पाहूनचाराकरीता आपल्या जावयास लंकेत बोलावले होते.
जावयाचा लंकेत जयजयकार होत होता. मग रावण म्हणाला', पण हल्ली खोटे बोलतो'. त्याने सांगितले होते की माझ्या मुलीचा विवाह झाडूवाल्याच्या मुलासोबत होईल.तेव्हा त्या राजा झालेल्या मुलाने सांगितले की, "माफ करा मामामी तोच मुलगा आहे.".तो आपल्या पायाचा अंगठा दाखविला. तेव्हा रावणाला खात्री पटली. या बृम्हदेवाच्या गाठी असतात..........
