लग्न
लग्न
एका गावात एक मुलगा राहत होता. तो चांगल्याप्रकारे शिक्षण घेऊन मोठी नोकरी करु लागला. त्याचे गावातीलच एका मुलीवर प्रेम होते. ते लपाछपी करत केव्हा केव्हा एकमेकांना भेटत होते. आणि हे प्रेम करत करत शेवटी दोघेही लग्न करण्याचे ठरवले. झालं या दोघांचे लग्न ठरले आणि लोकांनाही माहिती झाले. पण देवाणघेवाणीचे नेमके ठरले काय. ही उत्सुकता सगळयांना होती. लोक तर्कवितर्क लावू लागले पण यातही आमचे अंदाज खरे ठरले. मुख्य म्हणजे कुठल्याही अडथळ्याविना लग्न ठरणार हे सांगणारे आम्हीच होतो.
कारण हुंडा मानपान वगैरे मागण्या नव्हत्या. कारण दोन्ही घरचे तेवढे सामाजिक बांधिलकी , सुधारक दृढ नाती जपणारी होती. हुंडा म्हणजे समाजाला लागलेला एक कलंक. उपवरांची समजून घेत एकमेकांना जुळवूनघेत त्यांची मने पण जुळली पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचे आहे. दोन्ही घरच्यांचा एकमत की एक दिवसाचा लग्नातला दिखाऊपणाचा खर्च व्यर्थ आहे.
स्पष्टच ठरवले की कुठलाही दिखाऊ पणा करायचा नाही. जमेल तेवढया कमी खर्चात लग्न करायचे. आणि हो मुलाकडच्याने सांगितले की लग्नाचा अर्धा खर्च आम्ही करणार. मुलगी तुमची असली तरी आमची होणारी सून आहे. म्हणजे आमची लेकच्या. मग काय आता लग्नाच्या तारखेबाबत बोला म्हटले एकाने .
अखेर तारिख ठरली. आणि बघता बघता लग्न झाले.. या दोघांचे प्रेम अखेर लग्नात साध्य झाले. यांना खूप खूप शुभेच्छा देऊन वऱ्हाडी मंडळी परत गेली.
