STORYMIRROR

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

लेखन कौशल्य

लेखन कौशल्य

3 mins
75

लेखन कौशल्य.... लेखन कौशल्य म्हणजे आपले विचार आणि आपल्या कल्पना लिखित शब्दांमध्ये व्यक्त करण्यासाठी पुरेसे ज्ञान असणे होय. मराठी भाषा जशी वळवावी तशी वळते. ही भाषा रमणीय आहे. आपल्या मराठी भाषेत खूप गोडवा आहे. मराठी भाषेची महती मोठी आहे. मराठी भाषेचे सौंदर्य मनाला आनंद देते.ही राजभाषा आहे. लेखन कौशल्य प्राप्त करताना प्रथम आपण स्ट्रोक्स याकडे लक्ष द्यावे. हे स्ट्रोक्स कुठले तर आपण लहान मुलांना तिरप्या रेघा ,सरळ रेघा वर्तुळाकार रेघा,अर्धवर्तुळाकार रेघा यांचा समावेश करून घेतो. इथूनच माणसाच्या लेखनाला सुरुवात होते. कोणतेही कौशल्य प्राप्त करताना ते टप्प्याटप्प्याने प्राप्त होते. श्री शिवाजीराव भोसले आपल्या भाषणामध्ये म्हणायचे नेहमी की, " लेखन ही एक अक्षर क्रीडा आहे ती आनंदाने करता यायला हवी ". प्रत्येक मराठी भाषकांवर श्री शिवाजीराव भोसले यांचा विचारांचा पगडा दिसून येतो. लेखनाला सुरुवात होते ती हस्ताक्षर,शुद्धलेखन यापासून होते. शिक्षक म्हणतात बघा 'छान लिहिलेस तू.' या छान शब्दांपासून ते वळणदार शब्दांपर्यंत लेखन उत्तम करता येण्याचे नियम म्हणजेच स्ट्रोक्स यांचा अतिशय महत्त्वाचा वापर आहे. शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे जर का आपण लेखन केले तर ते वाचणाऱ्याच्या मनावर राज्य करते. शुद्धलेखन बिनचूक असल्याने दिसायला डोळ्याला खूप छान दिसते. काही शब्द असे असतात की आपल्याला डोळ्याला पाहून करतात की हे शुद्धलेखन बरोबर नाही. हेच शुद्धलेखन मग आपल्या आत्मविकासासाठी उपयोगी पडते. मग अगदी बालवर्गातील लहान मुलांच्या रोजच्या वहीतल्या लेखनाचे अक्षर असो किंवा कोणी साहेबांना लिहिलेले पत्र असो शुद्धलेखनाचा व चांगला आकाराचा विशेष प्रभाव इथे पडत असतो. भाषा विकासासाठी आपण लेखन कौशल्यांचा वापर निश्चितच करतो. या लेखनात इतरांचे साहित्य असते.वांग्मयीन साहित्य असते.कविता असतात. निबंध वजा लेखन असते. मुद्देसूद पत्रलेखन असते. कल्पनाविस्तार असतो. संवाद लेखन असतो. या सर्व लेखन साहित्याचा अनुभव घेऊन, वाचन करून आपण आपल्या भाषेमध्ये विचारपूर्वक, क्षमतेपूर्वक लेखन करण्यास समृद्ध बनतो. आपल्या विचारात आणि लेखणीत खूप सामर्थ्य लपलेले आहे. आपल्या लेखणी पासून आपण समाज प्रबोधनही करू शकतो. आपल्या लेखांमधून आपण विचार मांडून इतरांची विचारशृंखला बदलण्याची ताकद आपल्या लेखणीत असते. विद्यार्थ्यांचा लेखन त्यांच्या विकासासाठी फार महत्त्वाचे ठरते. लेखन कौशल्य आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करते. सर्जनशीलता जागी करते. नवीन विचार मांडून समाज विकास करता येतो. स्वतःचे स्वतंत्र विचार मांडता येतात. स्वतःचा मजबूत असा शब्दसंग्रह तयार होतो. नवीन शब्दांची ओळख होते. आपण आपल्या वैयक्तिक जीवनात यशस्वी होण्यास मदत होते. स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. तर... आपण मराठी लेखन करताना मराठी शब्दांवर व्यवस्थित लक्ष द्यावे. मधेच मराठी किंवा हिंदी शब्दांचा वापर करू नये. मराठी शब्दांवर आपले प्रभुत्व हवे. मराठी भाषेत विरामचिन्हांचा वापर आवश्यक आहे. विरामचिन्हांचा वापर केल्या नंतर आपण वाचन त्याप्रमाणे करणे अपेक्षित असते. वाचन करणे सोपे जाते. अलंकारिक शब्दांचा वापर केल्यानंतर ते मराठी भाषेचे आकर्षण ठरते. लेखन करताना आपल्या लेखनामध्ये काही चिन्हे वापरायचे असतील किंवा काही चित्र वापरायचे असतील तर आपण त्यांना वेगवेगळ्या रंगात रंगवावे. वाचन करताना पटकन ते लक्षात येते. एखादे फळ घेतले तर, त्या फळाची चव, रंग,वास, इत्यादी मनातून येणारे शब्द लिहिले असता शब्द साठा अमाप होतो. शब्दसंपत्तीत भर पडते. कोणतेही लेखन करताना मुद्देसूद करावे. वाचताना एकाग्रता निर्माण होते. पुढे काय लिहिले आहे याची ओढ लागते. असे आपले लेखन कौशल्य हवे.. लेखणीतून भरावे नवे शब्द शब्दांची होऊ द्यावी बरसात मग शब्द बरसतील परसात नाव होईल आपले समाजात.. *वसुधा वैभव नाईक*


Rate this content
Log in