लेक
लेक
लेक माहेराच सोन असते,ती सोनपावलांनी जन्माला येते,ती एक काळी असते जी घरातील आई बाबांनी लावलेल्या रोपट्यावर हळू हळू उमलत जाते. जी बोबड्या आवाजात घर अंगण गजबजून ठेवता,तिच्या पायातील घुंगरुंनी ती पूर्ण घरभर आनंद पसरवत असते.जिच्यामुळे बाबाला त्यांच्या आई ची जाणिव होत नाही आणि आईला ही स्वतःची सावली असल्यासारखं वाटतं. हीच सावली एक दिवस आई वडिलांचा मान सन्मान ठेवायला सज्ज होते. आणि सुरू होतो तो शोध वर मुलाचा
एखादी वस्तूही कोणी कोणाला या जगात देत नाही आणि वृद्ध आई वडील स्वतःच्या काळजाचा तुकडा परक्या व्यक्तीच्या हाती देऊन मोकळे होतात. तो देऊनही ती मुलगी सुखी राहील की नाही याची खात्री नसते. का खात्री नसावी त्या पित्याला आपल्या मुलीच्या सुखी जीवनाची.
