End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Bhagyashri Chavan Patil

Others


2  

Bhagyashri Chavan Patil

Others


लेक लाडकी चालली सासरी

लेक लाडकी चालली सासरी

4 mins 155 4 mins 155

    आयुष्य म्हणजे काय हे कधी कधी खुप सोपं आहे असं वाटतं पण कधी कधी काही विचार आठवणी मनात घर करून राहतात आणि आता त्याच आठवणी आठवून डोळ्यातील पाणी सारखं गालावरती येते आहे मनात खूप भीती आहे आपल्या आई वडील भाऊ आणि बाकी सगळ्यांना सोडुन मी जाऊ तरी कशी ज्यांनी आज पर्यंत हक्कानी तळ हाताच्या फोडा प्रमाणे जपलं ज्यांनी सगळ्या चुका पोटात घेतल्या स्वतः कष्ट करून आम्हाला मात्र सुखी ठेवलं आणि आता ह्र्दयावरती दगड ठेवून आपली पुढची जबादारी पार पाडताना दिसत आहेत म्हणजेच स्थळ बघण्याच शोधकार्य सुरू आहे आणि त्याचे दडपण माझ्या मनावरती आहे की ह्या सगळ्यांना सोडून माझं नेमक होणार तरी कसं आणि त्याची उत्तरं शोधत शोधत एक नवीन घर आपल्या मुलासाठी म्हणुन एक सहचारिणी शोधत आपल्या दार ठोठावत आपल्या मुलीला मागणी घालतात आणि मग काही दिवसातच दोघांची ओळख करून दिली जाते पसंती नापसंती होते आणि हे कार्य खुप दिवस करता चालूच राहतं आणि ते तीच आपलं असं घर बनलं जात याची घालमेल त्या दोघांच्याही मनात सुरू होते..

          

      बहुतेक अस प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असावं रोजच्या जागेची सवय जणू काही वेगळीच भासू लागते घर सुद्धा काहितरी बोलू पाहत असतं प्रत्येक जागा ही आपल्या लहान पणीच्या आठवणींना उजाळा देत असतात तर काही आठवणी आठवून खुदकन हसू किंवा डोळ्यात पाणी येतं घरातले सगळे लोक खुश असतात घरात येणारी पै पाहुण्यांचा ही मोठा वाटा असतो त्यामुळे तर थोडासा भार हलका होतो आणि आजोळ ची मंडळी ही तेवढीच खुश होतील त्यांच्या ही डोळ्यात पाणी असेल आणि त्या मुलीसाठी असणारी माया ही अतोनात असेल आणि इत्तर नातेवाईकांना हातभार ही मोठा असेल काही जण चिडवतात काही जण लग्न समारंभ होणार म्हणूनच आनंदी होतात काही जण पुढे उपयोग होईल म्हणून सल्ले देतात तर काही जण मायेने विचारपूस करून खायला प्यायला देतात प्रत्येक जण आपापल्या परीने त्या मुलीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो

      

      लहान पणापासून जे घर आपलं वाटतं असतं त्याच नाव आपसूकच माहेर असं होतं आणि जिथे ती मुलगी लग्न होवून जाते ते तीच सासर होतं काही क्षणामध्ये नाती बदलत जातात मुलीला परक्याच धन का म्हटलं जात ह्याचा अर्थ हळू हळू समजायला लागला आहे मायेचं घर म्हणजे माहेर जिथे रांगायला दुडू दूडू धावायला बोबडे बोल बोलायला लागलो नुसता दंगा मस्ती करत घर नेहमी हसत खेळत ठेवलं आईची साडी नेसून भातुकलीचा डाव मांडला तर कधी बाबांनी आणलेल्या छोट्या बाहुलीच लग्न लावलं तर कधी अश्या खेळात भावाला सहभागी करून त्याच्या ही नाकी नऊ आणले तर कधी त्याच्याशी काही गोष्टी बोलल्या एकत्र खेळलो भांडलो आणि आता मोठे ही झालो तर कधी मी गप्प राहील की किंवा बाहेर राहायला गेलं की घरातील चैतन्य हरवल्या सारखं असं प्रत्येकाला वाटतं तसचं काहीच आता हे माहेवाशीण होवून जाताना प्रत्येक मुलीला ते जाणवत असतं बघायला गेल तर सगळं सोप्पं सरळ वाटतं पण इथे तर भावनिक गुंत्यांचा सारा खेळ मांडलेला दिसतो आणि कोणती तरी जबादारी अंगावर पडली याचा सारखा विचार मनात येऊन मन अगदी शांत होत ..

       

         शाळेत असताना अभ्यासाची उजळनी करून जातो तशी मनात लहान पणापासूनच्या आठवणींची उजळणी होत असताना दिसत आहे नवीन घरी जाण्यासाठी जितकं मन आतुर नाही कारण आई बाबा भाऊ आणि बाकी सगळ्यांना सोडुन जाण जड जाणार आहे तितकं आपलं घर सोडून जाण्याचं जास्त दुःख वाटतं आहे मला तर वाटत मुलीला आपल अस घर नसावं भवतेक कारण दोन्ही कडे तिची ओढाताण होत असते नेमके तिचे घर कोणते हेच तिला समजत नाही जणू तिचा हा नवीन जन्मचं असावा असं निदान मला तरी वाटतं आणि तोच विचार करून मनाची अगदी दोलायमान स्थिती होते दोन्ही कडे ही आपलीच लोकं कारण सासर म्हणजे सांभाळून घेणार घर म्हणजे सासर मग ते ही तितकंच महत्त्वाचं आणि जवळच होईल तिथे जाऊन पुढचं आयुष्य बनतं घडत फक्त माहेर तुटतं

 

        नवीन संसार नवीन जबाबदारी आणि नवीन लोकं नवीन नाती यात सगळं काही सांभाळता एक नवीन अध्याय जणू सुरू होतो काहीजण मैत्री करतात तर काही जण शिकवून आपलस करून घेतात मग त्यांची काळजी करायची रोजच जगणं च बदलून जातं आणि त्यात सामावून जायला प्रत्येक मुलीला वेळ हा लागतो.बर या बद्दल मी अनुभव आला की चांगल वक्त होईन असं मला वाटतं कारण आता फक्त मनावर दडपण आहे नवीन जबाबदारीच तेच मी चांगल्या परीने पेलवून नेईन अस मला ठाम विश्वास वाटतो कारण माझ्या मुळे माझ्या घरातल्यांना माझी काळजी करावी लागणार नाही याची काळजी मी नक्की घेईन आणि माझ्या घरच्यांना नेहमी माझा अभिमान वाटेल असच मी बोलेन वागेन सगळ्या नवीन लोकांना आपलस करून प्रत्येकाची जबाबदारी बनेन थोरा मोठ्यांचा आदर करेन आणि लहानांना लाड करेन आणि सगळ्यात महत्वाचं मी या सगळ्यांत खुप सुखी समाधानी राहीन हे मात्र नक्की पण यात माझं घर माझं पाठी राहत कधी राहायला आलं तर पाहुणी म्हणुन आल्यासारखं घरात वागवलं जाईल आईची खुशी अजूनच उबदार वाटेल तिचा डोक्यावर पडणारा हात नुसताच मला नवीन प्रेम ऊर्जा देऊन जाईल बाबांची छोटीशी शिकवण काहीतरी मोठं अस शिकवून जाईल आणि भावाच्या डोळ्यातील माझ्या बद्दलच प्रेम बघून मानला एक आधार मिळेल त्याच बोलणं ऐकून मन अगदी प्रसन्न होईल असं प्रत्येक मुलीचं लग्न करून जाताना हीच घालमेल होत असेल आणि तेव्हाच कोणीतरी बोलेल लेक लाडकी चालली सासरी...


Rate this content
Log in