Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

लढा करोनाशी

लढा करोनाशी

2 mins
243


मी थंडी तापाने उडत होते. सगळे अंग दुखून येत होते परंतु या कालावधीमध्ये कोणीही माझ्या रूम मध्ये फिरकले नाही. कदाचित त्यांचा तो मधला ले पिरेड असावा. त्या दोन-चार दिवसात नशीब देखील खूप खराब होते. माझी रूम शेअरिंग पार्टनर होती. ती पण covid-19 ची पेशंट होती. तेथेच काम करणारी स्टाफ नर्स होती. पण नवीन जनरेशन जराही माणुसकी कशाशी खातात ते माहीत नाही(सर्वच नवीन जनरेशन असे असते असे नाही) त्या मुलीने चार दिवसात एक शब्दाने देखील संभाषण केले नाही. मग तुम्हाला काय होते विचारणे लांबच. तिच्या त्या अटीट्युडचे मला फार वाईट वाटत होते. माझ्या नर्सेस अशा असू शकतात यावर माझा विश्वास बसत नव्हता. मी सारे आयुष्य, तेहतीस वर्षे नोकरी फक्त नर्सेस साठी, त्यांची बाजू घेऊन भांडण्यात घालवली. मी युनियनचे काम केले आहे. तिच्या त्या वर्तणुकीने माझ्या मनाला फारच क्लेश होत होते.असो.


त्यानंतर रात्री डॉक्टर आले माझ्या वरती उपचार सुरू झाले, एक्स-रे झाला, दोन वेळा सिटीस्कॅन झाला औषध उपचार सुरू झाला. प्रत्यक्षामध्ये covid-19 या विषाणूसाठी कोणतीही खास ट्रीटमेंट किंवा त्याची गाईडलाईन उपलब्ध नाही सध्या त्यावरती steroid देतात. त्यांनी, Antibiotics, steroids, tonics, tamiflu या सर्व प्रकारच्या गोळ्या सुरू केल्या शिवाय तापावरती ट्रीटमेंट चालू होती. प्रश्न फक्त एक होता कोणती गोष्ट वेळेवर मिळत नव्हती. तिथे जाऊन तिथल्या नर्सेसला ओरडून, थोडीशी दादागिरी करून शिवाय माझा मुलगा तिथेच असल्याने तो सतत आढावा घेत होता आणि एकंदरीत बऱ्यापैकी ट्रीटमेंट चालू होती.


मात्र संध्याकाळी पाच ते सात या कालावधीमध्ये ताप यायचा त्याने पूर्ण शरीर पिळवटून निघायचे. एक प्रकारे मी त्या तापाची आणि त्या वेळेची धास्ती घेतली होती. ज्या रुग्णांना मुळातच डायबेटिस ब्लडप्रेशर इत्यादी गोष्टी असतात त्यांच्यासाठी covid-19मधून बरे होणे सोपे नाही. कारण steroid ट्रीटमेंटने ज्यांना शुगर नसते त्यांना पण शुगर निघते आणि डायबेटीस पेशंटची शुगर सतत वाढतच जाते.सतत दिवसभर वर खाली असते सकाळी 200 असेल तर संध्याकाळी 500 निघते. यासाठी सोपे उदाहरण म्हणजे आम्ही आदिवासी भागांमध्ये स्नेकबाईटचे पेशंट ट्रिट करायचो, त्यामध्ये अस होत एखाद्या पेशंटला इंजेक्शनचीच एलर्जी असते.पण रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी ते देणे गरजेचे असते अशा वेळी आम्ही एका बाजूला स्नेकबाईटचे इंजेक्शन द्यायचो, तर दुसऱ्या बाजूला ॲलर्जीचे इंजेक्शन टोचायचो. अशीच परिस्थिती डायबेटीस पेशंट होते शुगर वाढली तरी त्याला steroid द्यावेच लागते आणि ते कमी करण्यासाठी इन्शुलिन द्यावे लागते. इतर नॉर्मल पेशंटसाठी ठीक आहे ते सांगतात आम्ही पाच दिवस आराम केला खाल्ले पिल्ले दूध घेतले, अंडी घेतली पण आमच्यासारख्या high risk रुग्णाला मात्र सोपं नसतं. जेवण मात्र जातच नाही. फक्त तुमच्या मनाची उभारी ठेवायची मनाने खंबीर राहायचे आणि मला काही न होता मी पुन्हा घरी जाणार आहे हे सतत स्वतःला बजावायचे. त्यामुळे मी असा सल्ला देईन, हाय रिस्क रुग्णांनी अंगावरती काढू नये, दम लागेपर्यंत घरात बसू नये. ताबडतोब डॉक्टरकडे जावे.

********* **********


Rate this content
Log in