STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

कवितेचे सामर्थ्य

कवितेचे सामर्थ्य

3 mins
452


कविता अशी असावी, नभांगनी जितके चांदणे विखुरले आहेत. त्यापेक्षाही जास्त कवितेचं सामर्थ्य आहे. ब्रम्हांडात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर कवितेचं साम्राज्य आहे.. मानवाच्या अवती भवती फिरून वेध घेणारी बोध देणारी तिच खरी कविता असते. निसर्गाच्या सान्निध्यात तिचे अस्तित्व फुलून अजूनच निखरत असते. तिचे सौदर्य अन् कुरूपता वाखाणण्यासारखे असते. तिचे वर्चस्व मानी, अभिमानी कर्तबगारानीही मानले आहे.


पशु-पक्ष्यांच्या जीवनातील त्यांच्या हृदयातील हालचाली हेरून जी कविता उजागर होत असते तिच खरी कविता असते. सुर्य, चंद्र, तारे, आकाश, ब्रम्हांडात ही कविता विलसत असते. तिचे असंख्य रूपे असून भावविश्वात रमन करणारी कविता असते. ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडणारी, घुसखोरी करणारी, डोळ्यातील अश्रूला वाट मोकळी करून देणारी, दु:खाला शमवणारी, सुखाला बोलावणारी, गरजूंना आनंद देणारी, तिच खरी कविता असते.


विश्वाच्या गतीशिलतेचा प्रशस्त स्रोत छोट्या कवितेत सामावून वर्णित होते, तिच खरी कविता असते. दैनंदिनी समाजातील अडी अडचणी जाणून घेणारी, बुद्धीमत्तेला जागृत करून विद्वत्ता भूषविते तिच खरी कविता असते. मनातील प्रत्येक तरंगभाव चौफेर धुळकणासारखा पसरवते तिच खरी कविता असते.


कविता कविता असते. कुणाचीही तिच्यावर जबरदस्ती नसते. लेखणीचा चमत्कार शब्दांतून व्यक्त भाव असते. अक्षरांनी परिपूर्ण सजलेली संपुर्णत: तिचीच सत्ता असते. तळागाळातील चिखल, माती अणु, रेणुपर्यंत कवितेची मजल असते. ती फक्त कागदावरची ओळच नसते! ती जीवंत अष्टपैलू धारण केलेली हिरकणी असते. कधी ती मृगजळाप्रमाणे पसरतच रहाते. कधी मोहळाला बिलगलेली मधमाशी असते... तर कधी ती गदारोळ करणारा सर्वंकश आवाज असते.


कधी वाहवा मिळवते तर कधी दगडांचा मारा सहन करते. आयुष्याचे गमक असते. कधी सार्थक असते.

कधी पाखरांच्या पंखांवरती कविता झोके घेत असते. कोकिळेच्या मधूर कंठाच्या मधुरम रसमय गीत होत असते. कधी पाखराच्या चोचीतील दाणे टिपते. राजहंस, मोर, नीलकंठाची प्रणय लिला विलोभनीय दृष्य कवितेत साकार होत असते. नखापासून केसांपर्यंत ही कविता पोहोचते. अवघे कल्पना विश्व  कवितेत सामावते.


जशी प्रियकराची ती प्रीत तसाच सखीचा तो सजना असतो, प्रेमप्रणयांकित किल्लोर, प्रणयरम्य पहाट तर मधुचंद्राची रात्र असते. मधाळ बोल तर कधी कठोर वार, एकवचनी कधी अनेकवचनी असते. आग्रह, विद्रोह, कुसंस्कारी कधी सुसंस्कारी, अल्लड बाललिलेत रमणारी, कधी रसरसलेली तारूण्यातली लखलखणारे यौवन असते. कधी वासनाधीन शरीरगामिनी वेश्या, वारांगणा अश्लीलतेच्या सिमा पार करणारी अशी असते.


विश्वात भु

रळ पाडणारी कविता, श्रीकृष्णाची गीता, बायबल, कुराण, वेदव्यासांचे महाभारत, तर वाल्मिकांचे रामायणाचे दोहे, कालिदासाचे महाकाव्य, नानकांचे गुरूग्रंथ साहिब, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, मीराबाईची रचना, स्वामी समर्थ, नामदेव, तुकारामाचे अभंग, जनाबाई, सावतामाळी, बहिनाबाई, सुरेश भट अशा अनेकांच्या कविता समृद्ध अाहेत... कबिरांचे दोहे, रैदासाचे, सुरदासांचे, बेखुद देहलवी, कातील शिफाई, आमिर खुसरो अनेक संतांना या कवितेने जीवनदान दिलेले आहे. अतुलनिय प्रभाव या कवितेने विस्तारित साम्राज्य स्थापित केले आहे आणि अप्रतिम कवितेचे भरभरून कौतुकही झाले आहे.


सुर्याची तेजस्वी विस्तारीत आभा ही कविताच असते. चंद्राचा शीतल प्रकाश जसा चहूकडे शांती भरवते, त्याचप्रमाणे कविता आपली आल्हादकता कणकणात मिसळवते. कविता जेव्हा जन्माला येते तेव्हा तन-मन सहयोग देत असते. कोणी तत्वज्ञ म्हणतात की शब्दाला शब्द जोडून कविता करताय.! पण सत्य हेच असत की शब्दाला शब्द जुळते तेव्हाच कविता प्रसवत असते.


शब्दच तिची असंख्य लेकरे असून कवितेच्या अंगाखांद्यावर खेळत असते व कुटुंबात वेल्हाळत असते आणि भरगच्च शब्दांचा संसार फुलत असतो व ती कविता अक्षरांनी परिपूर्ण सजलेली, नटलेली असते. सर्वच कविता श्रेष्ठता भूषवित नसते, अर्थातच! पाचही बोटे सारखी असतात अस नाही. सर्वच कवितेची लेकरे सद्गुणी असतात तर दुर्गुणीही असतात. काही नटतात तर काही पिछडतात, हा नियम जगात सर्व मनुष्य असो वा प्राणी असो वा कविता असो.! तो सर्वांनाच लागु पडतोय.!.काही कविता आंधारातल्या काजव्यांच्या प्रकाशाप्रमाणे चमकत असतात आणि काही कविता मिनमिनत्या प्रकाशाप्रमाणे अस्त होतात.

  

शब्दांतून व्यक्त केलेली प्रकाशित कविता ही कधी गौरवगाण मिळवते तर कधी अपमान झेलत असते. कधी प्रसन्नता मिळवते तर कधी शल्य जोपासत असते. कधी नवचेतना व स्फुर्ती देत असते, तर कधी निरूत्साही वेदनेत रमवणारी असते.


काही कविता श्रीमंत असतात तर काही कफल्लक असतात. काही आयुष्य घडवत असतात तर काही कहर करतात... कविता ही कूठेही प्रगट होत असते..


गौतम बुद्धाला ती पद्मासनात मिळाली,  

महावीर सिद्धार्थाला उकडू आसनात मिळाली

येशू ख्रिस्ताला ती क्रुस, सुळीत मिळाली..

सुकरातला ती विषात मिळाली...

रैदासाला ती जोडे, चप्पल शिवताना मिळाली....

कबीरदासाला चादर विणता विणता मिळाली...

गोरा कुंभाराला माती सांधताना मिळाली...

सुरदासाला एकताऱ्यात, विणेत मिळाली...

कुणाला कुठे तर कुणाला कुठे ही कविता मिळाली. विश्वातील ती एकमेव चिरंतन कविता शाश्वत सत्य व सुंदर अशी आहे.


Rate this content
Log in