Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

कुटुंब नियोजन काळाची गरज

कुटुंब नियोजन काळाची गरज

2 mins
210


या विषयावर मी अधिकार वाणीने लिहू शकते. कारण मी या क्षेत्रात काम केले आहे, आणि करतोय. गाव पातळीवर तsदेखील मी 1987 चे 90 या कालावधीत काम केलेले आहे. लोकांना तेव्हा कुटुंबनियोजन हा प्रकार नवीन होता. फारसा पटलेला नव्हता, परंतु हळूहळू कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी महिला  येत होत्या. त्यात पण भेदभाव असा आहे पुरुष स्वतःची नसबंदी शस्त्रक्रिया करत नाही .


हे म्हणजे बाळंतपणाचे दुःख देखील तिनेच सोसायचे आणि शस्त्रक्रिया पण तिच्यावरच. त्यावेळी आम्हाला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यांचे टारगेट असायचे. दर महिन्याला एक शस्त्रक्रिया आणि दोन काॅपर्टीच्या केसेस पाहिजे असायच्या. आम्ही स्वतः तेव्हा अविवाहित असून लोकांना जाऊन आम्ही कुटुंबनियोजनाचे महत्त्व सांगायचे. यामध्ये मग किती जण आम्हाला वेड्यात काढायचे. आमची खिल्ली उडवायचे. बाई तुमचं लग्न झालेले नाही, तुम्हाला काय कळतं. कुटुंबनियोजनाच काय कळतंय? शिवाय नर्स चे हे दुःख आहे तिने पुरुषांना कंडोम वाटायचे. माझी एक हाताखाली काम करणारी एएनएम होती अशा माझ्या हाताखाली सहा मुली होत्या आणि सुपरवायझर म्हणून मी जाऊन त्यांना टारगेट पूर्ण करण्यासाठी  पिच्छा पुरवणार, आणि आणि माझे सीनियर, वरिष्ठ डॉक्टर, ए डी एच ओ ,डी एच ओ हे माझ्या विभागात काम किती झाले म्हणून माझ्या मागे लागणार. अशी ती सारी चेन होती.


तर त्यातली मुलगी सांगायची, मॅडम एका घरामध्ये आम्ही कंडोम टाकतो तर त्या घरातील माणूस लगेच ते कन्डोम आमच्या तोंडावर बाहेर फेकतो. तर अशा परिस्थितीमध्ये तीस-पस्तीस वर्षांपूर्वी मी आणि माझ्या हाताखालील परिचारिकांनी काम केलेले. तिथल्या भंडारवाडामध्ये कोळीवाडामध्ये गेले तर तिथले पुढारी आम्हाला सांगायचे तुम्ही मोहल्यामधून दोन केसेस आणा आम्ही तुम्हाला येथून 10 केसेस देतो.


आता गावपातळीवर काय परिस्थिती आहे मला माहित नाही ,परंतु आत्ता ज्या एरियामध्ये मी काम करते तो मुस्लिम बहुल आहे .तिथे तर काय बोलायची गोष्टच नाही. एवढ्या वर्षाच्या कालांतराने ,इतर धर्मातील सर्व लोकांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटलेले आहे. आणि आता ते लोक स्वतःहून एक किंवा दोन मुलं झाल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी येतात.

परंतु मुस्लिम समाजाला मात्र अजूनही कुटुंब नियोजन करावयाचे नसते. कमीत कमी चार मुले तरी जन्माला घालतात. त्यामध्ये अजूनही सहावं, सातव अशी मुले जन्माला घालणाऱ्या स्त्रिया आमच्याकडे मुंबईमध्ये एका मुस्लिम बहुल विभागातील हॉस्पिटलमध्ये येत आहेत. विशेष म्हणजे आत्ता त्यांच्यातीलच मंत्री महोदय आहेत. त्यांची बहीण नगरसेविका आहे .परंतु त्यांना या गोष्टी आपल्या समाजाला पटवून द्यायच्या नाहीत .तर उलट जेवढे वाढतील तेवढे त्यांच्या समाजाची लोकसंख्या वाढवायची आहे.

एकदा मी त्या नगरसेविका मॅडमला बोलले अहो जरा काहीतरी तुमच्या विभागातील बायकांना सांगा. पाचवं सहावं मूल काय टारगेट आहे का? तर ती मला सांगते "नही नही हमारा मालवणी मजबूत करने का है" तसेच एक आमच्या हॉस्पिटलला त्यांच्या समाजातील डॉक्टर जोडपे आहे ते स्वतः सुशिक्षित असूनदेखील कधीही त्यांच्या समाजाला याबाबत कौन्सिलिंग करत नाहीत. एकही शब्द याबाबत बोलत नाहीत.

जोपर्यंत ह्या गोष्टीसाठी कायदा होणार नाही आणि समान नागरी कायद्याच्या अंतर्गत सर्वजण येणार नाहीत, तोपर्यंत आपणाला फक्त बघतच बसावे लागणार आहे. आणि हा लोकसंख्येचा भस्मासूर या सुजलाम सुफलाम भूमीला गिळंकृत करणार आहे.


Rate this content
Log in