STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

क्षण

क्षण

2 mins
10

क्षण.. 🏵️जीवनातील काही क्षण जपायचे असतात. 🏵️काही क्षण हसत खेळत टिपायचे असतात.
 🏵️काही क्षण असे येतात की ते हवेत पटकन विरून जातात.
 🏵️काही क्षण असे असतात की आपल्या मस्तकाच्या प्रत्येक भागात साठत राहतात.
 🏵️काही क्षण असे असतात की विसरायचं म्हटलं तरी विसरू देत नसतात.
 🏵️ काही क्षण असे असतात की विसरायचं म्हटलं तर हसत हसत त्यांना सुंदर क्षणातील मोतींनी आपण टिपायचे असतात. मग कदाचित ते विसरायला लागतात.
 🏵️काही क्षण असे असतात की आपोआप डोळ्यातनं आसवे गाळतात.
 🏵️काही क्षण असे असतात की भावनिक होऊन मनाला जखमा करणारे असतात.
 🏵️काही क्षण असे असतात की बौद्धिक विचारात्मक लेख, कविता मनावर कोरून जातात.
 🏵️काही क्षण वृद्धांच्या सेवेत घालवले असता अंतरिक, मानसिक समाधानही देतात.
 🏵️काही क्षण लहान मुलांमध्ये लहान मूल होऊन गेले असता आपल्याला खूप खूप आनंद देऊन जातात.
 🏵️काही क्षण आपली आवडती गाणी ऐकण्यात घालवले तर मन शांत करून जातात.
 🏵️काही क्षण पावसाच्या धारेमध्ये भिजले असता मन सुखात चिंब करून जातात.
 🏵️काही क्षण पावसामध्ये खिडकीबाहेर डोकवताना मस्त चहा,भजी आस्वाद घेताना जिभेवरची चव रेंगाळताना दिसतात.
 🏵️काही क्षण देवाच्या सानिध्यात घालवले असताना मनाला एक आत्मिक समाधान देऊन जातात.
 🏵️काही क्षणभर आपण समाजाची सेवा जरी केली तरी सुद्धा खूप, खूप आनंद मिळतो.
 🏵️काही क्षण आपण वैचारिक बैठकीमध्ये विचारांची अदलाबदल केली असता अगणित ज्ञान संपादन होते. 🏵️ काही क्षण आप्तेष्ट व नातेवाईक मित्रमंडळी यांच्याबरोबर घालवले असताना आपले पुढील काही दिवस तरी आनंदात जातात.
 🏵️असे हे जीवनातील काही क्षण सर्वांनी अनुभवावेत. या अनुभवाची शिदोरी आपण आपल्याबरोबर घेऊन जात असतो. आणि जीवनात जगताना या काही क्षणांचा खूप उपयोग होत असतो. मग मनात राग, द्वेष, मस्तर मोह हे काहीही येणार नाही. मनाला शांतता मिळून आनंद निर्माण होईल. 🏵️ असे हे काही क्षण सर्वांनी जीवनातले आनंदाने वेचूयात.
 🏵️ जीवन हे क्षणभंगुर आहे. या जीवनातील क्षणांचा उपभोग घेऊयात. माणूस आज आहे, आत्ता आहे, पुढच्या क्षणी आहे की नाही माहित नाही. देवाने जीवन दिले त्या क्षणांचा पुरेपूर उपयोग करून घेऊयात..
 वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा- पुणे मो. नं. 9823582116


Rate this content
Log in