कोरोनाचा थैमान
कोरोनाचा थैमान


प्रति,
कोरोना,
आज तू आपली जागा हिरो म्हणून सिद्ध केलीस. सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुझ्या नावाचा एक जप चाललय, मग ते न्युज, व्हाट्सअप, मेसेज, अगदी चौकाचौकात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना तुझी दहशत बसली आहे. तू एक चर्चेचा विषय बनला आहे तू खरच सगळ्यांना खूप घाबरवलेस.
अरे, तू तर जनमानसात, ऑफिसच्या कामात तू आडवा आलास, मुलांचे परीक्षेचे दिवस आहे ते पण तू लांबणीवर टाकले एवढेच नाही तर तो देवाला पण नाही सोडलं देवाची दार तुझ्यामुळे बंद झाली. ही देवळ जरी बंद झाले तर देवाच्या रुपाने तुझ्यावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबोय हे देव बनून माणसाच्या मदतीसाठी धावून आले. साक्षात देवाच्या रुपात रुग्णांची सेवा हे डॉक्टर, नर्सेस करत आहे. मास्क, सनीटायझर्स, डेटॉल यांची मागणी इतकी वाढली की त्याचा तुटवडा निर्माण झाला. माणूस मधली माणुसकी तुझ्यामुळे मरते आहे ही पण एक माणसातला व्हायरस आहे. हे काही माणसाचा पाठलाग सोडत नाही. खरंच हे बघून मन अगदी सुन्न होतं.
आज सगळेच तुला कंटाळलेत, तिरस्कार वाटतो तुझा, पण मी तुझे आभार मानण्यासाठी व तुला येथून जाण्यासाठी हे पत्र लिहिते आहे याचा गांभीर्याने तू विचार करावा असं मला वाटतं. तर बघ, आज समाजात सरकारनी जनजागृती करुन हर प्रकारे विनंती केली, समाजालापण सरकारला जे जमलं नाही ते तु काही दिवसातच करून दाखवल. काय? तर अरे, ही स्वच्छताच महत्त्व काय हे तू लोकांना दाखऊन दिलंस. मग ही स्वच्छता लोकल ट्रेन असो बस असो वा परिसराचीअसो किंवा खाजगी असो काय ही स्वच्छता वाढली म्हणून सांगू. आज टी.वी. वर सीरियल, सिनेमा बघताना ब्रेक दिला जातो. काही सेकंद तुम्ही हात धुवून या. मग उर्वावित भाग बघा. खरच जादू केलीस तू. फोनवर सुद्धा रिंग ऐवजी तुझ्या नावाचा जप होतो. जेवढा माणसांनी देवाचा जप केला नसेल तेवढा काही दिवसातच तुझ्या नावाचा जप झाला असेल. आहे की नाही गंमत.
बघ, माणूस म्हणजे मशीन झाला आहे. आज तुझ्यामुळे जगभरात शांतता आली आहे. मग ती ऑफिसचं काम असो, लोकल असो, गर्दी असो तुझ्यामुळे ही गर्दी लोपली आहे. आज तू आल्यापासून सगळे बदलले आहे.
आज पाच दिवस झाले सरकारने सुट्टी जाहीर केली त्यांना ऑफिस मध्ये खोटं बोलून एका दिवसाची सुट्टी साठी झगडावं लागतं आहे. शंभर उत्तर द्यावी लागतात, त्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा तू उपलब्ध करून दिली आहे. सगळं अगदी सोपा करून टाकलं. कारण की मुलं परीक्षेचा तणावातून मुक्त झाले. काही दिवसांकरता घरातलं वातावरण बदलले. घरात सगळे एकत्र वेळ घालत आहेत. एकत्र जेवण करतात. घरातली स्त्री सुद्धा सगळ्यांच्या आवडी-निवडी जपते. गप्पा करत वेळ घालवताना दिसते. परीक्षेच्या काळात कॅरम, पत्ते कपाटातून बाहेर आले. घरातली वृद्ध मंडळी बोलत आहे की "आजकालच्या मुलांना, नातवांना, सुनांना आमच्यासाठी वेळेच नाही" ही वृद्ध मंडळी पण खुश आहे. " यांना माझ्यासाठी वेळच नाही" म्हणणारी बायको मस्त गाणं गुणगुणत पतीसोबत वेळ घालवते. बाबांसोबत घरातल्या लहान मुलांना खेळण्यासाठी वेळ मिळतोय. आपापसातील नाती प्रफुल्लित झाली आहे. ह्या ब्रेक मध्ये पण तुझा खूप मोठा वाटा आहे. तुझे अस्तित्व नसते तर हे सगळं कदापि येणाऱ्या भविष्यात घडलं नसतं हे म्हणणे वावगे ठरू नये.
मला असं वाटतं की या निसर्गाने मानव जातीला एक धोक्याची सूचना दिली असावी कदाचित त्यासाठी तुला धरतीवर पाठवला असावा. हे सगळं ठीक आहे. काही अर्थी लोकं स्वच्छतेबाबत सतर्क झाले आहे. माझा विज्ञानावर पूर्ण विश्वास आहे. ह्यावर नक्की तोडगा काढेल. परंतु तुझा लगाम हा मात्र ह्या निसर्गाच्या हातात आहे. हे आता सगळ्यांना कळून चुकलं असावं. त्याने जर मनात आणला तर काही चमत्कार होऊ शकतो.
खरंच, तू आलास बरं झालं. पण प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो. तू आलास, खूप त्रास दिला, लोकांचे प्राण गेले, पण आता बस कर, खूप झालं.समाजात राहणाऱ्या काही लोकांचं एका हातावर पोट असतं रे बाबा, काहींच्या घरात आज चूल पेटली नसेल, त्यांच्या घरात जरा डोकावून बघ, लेकरं उपाशी झोपली असेल. त्यांच्यावर तरी दया कर. तू आला तसा वापस जा. तू सगळं हिरावून घेतलं.
आज माणसाला त्याची चूक समजली असेल, स्वच्छतेच महत्त्व त्याला कळलं असेल, फक्त तुला मी कळकळीने विनंती करते. तू आता वापस जा. जातांना सगळ्यांची माफी मागून जा. आता तू कधीही वापस येऊ नकोस.
तुझीच समाजातील एक अभागी