Priyanka Kumawat

Others

3  

Priyanka Kumawat

Others

कॉर्पोरेट स्त्री

कॉर्पोरेट स्त्री

3 mins
223


ऑफfसमध्ये आल्यावर मानसी नेहमीप्रमाणे एकटीच चहा घ्यायला गेली. चहाचा एक एक घोट घेत ती विचार करत होती. खरच आपण सगळीकडेच कमी पडतोय का? मुलाच्या जबाबदारी मध्ये कमी पडतोय, घरातील कामात कमी पडतोय, ऑफीस मध्ये हवा तसा फरफॉरमन्स नाही. डोक्यात एक एक विचार सरसर येत होते. सगळे करायच्या नादात काहीच नीट होत नाही असे तिला सारखे वाटत असे. तिच्या ४वर्षाच्या मुलाला वेदांत ला जॉबमुळे पाळणाघरात ठेवावा लागत असे. तिचे खूप मन तुटत असे पण वाढता खर्च, कॉलेज प्रमाणे झालेली शाळेची फी पाहता दोघांनी जॉब करणे अत्यंत महत्त्वाचे होते. घरी आल्यावर पण जास्तीत जास्त वेळ ती मुलाला देत.


कुठेतरी आतून तिला वाटत असे की आपण म्हणावे तसे पौष्टिक पदार्थ त्याला खाऊ घालत नाही. त्याच्या वाढत्या वयात ते जरूरी आहे. तिचे विचार काही थांबत नव्हते. वेदांत सारखा सारखा आजारी पडतो. सारखे सर्दी पडसे, खोकला, मग महिन्यातून एकदा ताप. मुलाकडे आपले लक्ष च नाही. एक चेक लिस्ट बनवली आहे त्याप्रमाणे त्याला रोज नवीन नाश्ता बनवत जाईल. पण कधीतरी घाई झाली की मग तात्पुरते काहीही करून द्यावे लागते.

घरात कितीतरी गोष्टी नीट साफ करायच्या आहेत. दाळी उन्हात ठेवायच्या आहे. पण विकेंड ला आराम करावा की मुलासोबत खेळावे की घरातील कामे करावे याबाबत तिला नीट निर्णय घेता येत नसे. ऑफीसमध्ये पण तिला कसेकसे होत असे. घरी लवकर जाण्यासाठी ती दिले तेवढेच काम करत. टीम मध्ये अजून २ मुले, एक मुलगी. त्यात ती मुलगी मॅनेजर ची एकदम फेवरेट कारण एकतर ती अविवाहित, दिसायला सुंदर आणि मॅनेजर एक माणूस. या सगळ्यांचा परिणाम बाकीच्यांवर होत. कितीही चांगले काम करा मॅनेजर ची चांगली रेटींग फक्त त्या मुलीलाच जात. मॅनेजर नेहमी प्रमाणे काहीही ना काही चुका काढून मानसीला साधारण रेटींग द्यायचा.


मानसीला आठवत होते जेव्हा पासून ती मुलगी आलेली ती सारखी मॅनेजर च्या मागे पुढे करत. ती एखाद्या सेक्रेटरी सारखे मॅनेजर चे कामे करत. मग त्याचा एखादा ई मेल करणे, त्याला चहा कॉफी आणणे. मानसीला या गोष्टी पटत नसे. आपल्या पदासाठी जे कामे आहेत ते अवश्य करावे पण उगीचच लोचटपणा करणे तिला आवडत नसे. त्यात मॅनेजर चे असे मत होते की ज्याचे इंग्लीश कम्युनिकेशन एकदम फरफेक्ट तो बेस्ट. खरतर सॉफ्टवेअर इंजिनीयरला दिलेली कामे वेळेत पूर्ण करायचे आणि communication चांगले एवढेच हवे. communication perfect च हवे असे नसते पण ती यात काय करणार होती.


काल तिला वाटत होते की प्रमोशनसाठी मॅनेजर माझे नाव पुढे पाठवेल पण पाठवले त्या मुलीचे. ती नवीन होती तेव्हा मानसी तिला कामात मदत करत. तिला नीट काम समजावून सांगत. ती तिच्या कामात मानसीएवढे तरबेज नव्हती पण फक्त मॅनेजरची फेवरेट आणि excellent communication च्या जोरावर तिला प्रमोशन मिळाले. मानसी ला तर काय करावे तेच कळत नव्हते. ऑफीस मध्ये ती ज्यादा तास थांबू शकत नव्हती. वेदांत तरी कितीवेळ पाळणाघरात राहणार. सगळीकडूनच तिला असे भरून आलेले. ती कुठेच परफेक्ट नाही असे सारखे तिला वाटत होते.

अशा कितीतरी स्त्रिया ज्या मुलाला पाळणाघरात सोडून कामावर जातात त्यांना हे सगळे सहन करावेच लागते. आजारी मुलाला सोडून जाणे आणि ऑफिसमध्ये कुवत असताना काहीच न मिळणे हे तोंड दाबून मजबुरीने सहन करायला लागते. त्या सगळ्या स्त्रियांना माझे हेच सांगणे की कोणीच आपल्या चांगल्या कामाबाबत आपल्याला certificate देणार नाही मग का त्रास करायचा. शक्य ते कामे जरूर करा पण स्वतःला पण वेळ द्या.


Rate this content
Log in