Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Shubhankar Malekar XII C 360

Children Stories Inspirational


3.8  

Shubhankar Malekar XII C 360

Children Stories Inspirational


कॉलेज 7

कॉलेज 7

3 mins 210 3 mins 210

आमचा सगळा ग्रुप ट्रिपला जाणार होता.आम्ही सगळ्यांनी ट्रिपची फी सुद्धा भरली.अभिषेक ही ट्रिप ला येणार होता.हळूहळू ट्रिपचा दिवस जवळ आला.आम्ही सगळेच ट्रिप ला जाण्यासाठी उत्सुक होतो.आम्ही दिं. 1/12/2019 सकाळी 7.00 ला प्रवासाला सुरुवात केली.आम्ही प्रवासात खुप मज्जा केली.आम्ही प्रवासात गाणी बोललो,हर्ष ने रात्री सगळ्याना एक भूताची गोष्ट सांगितली.ती गोष्ट ऐकुन पुजा खुप घाबरली होती.

     

आम्ही पुढच्या दिवशी दिल्लीला पोहचलो व काही वेळ तिथे एका हॉटेल मधे थांबून फ्रेश झालो व काही वेळानी केदारनाथ ला जायचा प्रवास सुरु केला.तेव्हा ही आम्ही खुप मज्जा केली.प्रवास खुप होता पण मित्र असले की प्रवासात कंटाळा नाही येत आणि सगळ्यांच्या मनात खुप उत्सुकता होती.

     

दि 3/12/2019 ला आम्ही केदारनाथ ला पोहोचलो.आम्ही तेथे एका हॉटेल मध्ये रात्रभर थांबलो होतो.मी,राज,हर्ष,परेश आणि कुणाल एका रुम मध्ये होतो व पुजा,वैशाली,वीणा,प्रज्ञा आणि सनिका एका रुम मध्ये होते.अभिषेक आणि त्याचे मित्र ही आमच्याच मजल्यावर एका रुम मध्ये होते.आम्ही सगळे रुम मध्ये गाणी ऐकत होतो.तेवढ्यात आमच्या रुम च्या दरवाज्यावर थाप पडली.आम्ही बाहेर जाऊन बघितला पण बाहेर कुणीच नव्हता. आम्हाला वाटला की आम्हाला भास झाला असावा परंतु परत काही वेळानी दरवाज्यावर धाप पडली.हर्ष ने पुन्हा दरवाजा उघडला परंतु बाहेर कुणीच नव्हता.काही वेळानी आम्हाला पुजा चा फोन आला.ती बोलली की “आमचा दरवाजा कोणी तरी बाहेरुन ठोकत आहे.”आम्ही तिला बोललो “आमचा पण दरवाजा बाहेरुन कोणी तरी ठोकत आहे.आम्ही त्यांना बोललो अभिषेकच मस्ती करत असेल.आम्ही त्यांना बोललो की आम्ही काही तरी करतो.”मग आम्ही फोन ठेवला.

   

    आम्ही हर्ष ला बाहेर पाठवले आणि लपुन लक्ष ठेवायला सांगितले.तो गेल्यावर आमच्या दारावर परत थाप पडली.तेवढ्यात हर्ष चा फोन आला.तो बोलला की “अभिषेक आणि त्याचे मित्र आपल्याला घाबरवण्यासाठी दार ठोकत आहेत.”आम्ही बोललो “ठिक आहे तू रुम मध्ये ये.माझ्या कडे एक plan आहे.आपल्याला घाबरवतो काय?,आता आपण त्याला घाबरवू.”हर्ष रुम मध्ये आला मी सगळ्याना plan सांगितल.मुलीनाही आम्ही फोन करुन plan सांगितल. राजने अभिषेकच्या रुम च्या येथे जाऊन फोन मधुन घुंगरूचा आवाज केला.अभिषेक आणि त्याचे मित्र आवज ऐकुन बाहेर आले.तिथे समोर त्यांना पांढरे कपडे घातलेली मुलगी दिसली.हा सगळा आमचाच plan होता.तो आणि त्याचे मित्र घाबरले होते ते त्या मुलीला बघायला पुढे येऊ लागले तेवढ्यात मागे परत घुंगरूचा आवज आला.त्यांनी मागे वळुन बघितले तर मागे कुणीच नव्हते.समोर बघितला तर ती मुलगी तिथे नव्हतीच.


    ते घाबरुन घाबरुन परत आपल्या रुम मध्ये निघुन गेले.ती मुलगी कोणी भूत नसुन पुजा होती.आम्ही सगळे आता आपआपल्या रुम मध्ये जाऊन झोपलो.सकाळी आम्ही सगळे केदारनाथ ला जायला एकत्र जमलो.अभिषेक येऊन आम्हाला रात्री घडलेल्या घटने बद्दल सांगु लागला.आम्ही शांत पणे ती गोष्ट ऐकली आम्हाला खुप हसू येत होत,पण आम्ही हसलो नाही.आम्ही पण त्याला सांगितले आमचा दरवाजा ही रात्री कोण तरी वाजवत होते.त्यानी आम्हाला खरे पणाने सांगितले की दरवाजा त्यांनी ठोकला होता. मग हसत हसत आम्ही पण त्यांना सांगितले की तुम्हाला सुद्धा आम्हीच घाबरवलं.सगळ्यां समोर त्यांची फजिती झाली.

(क्रमशः)


Rate this content
Log in