कॉलेज 6
कॉलेज 6


दिवाळीच्या सट्टया नुकत्याच संपल्या होत्या. आमचा कॉलेजही काही दिवसांनी सुरु झाला.आम्ही नेहमी प्रमाणे कॉलेजला गेलो.कॉलेजमध्ये जाताच आम्हाला सुचना फलकाच्या येथे गर्दी दिसली.आम्ही दुर्लक्ष केला आणि आम्ही आमच्या वर्गात जाऊन बसलो.आमच्या वर्गात कॉलेज च्या ट्रिप बद्दल चर्चा सुरु होती पण आम्हाला काहीच माहीत नव्हता.आम्ही आमच्या वर्गातल्या एका मुलाला विचारल की “तुम्ही सगळे इतका कोणत्या विषया वर बोलत आहात.”तर तो बोलला की “तुम्ही सुचना फलक वाचला नाही का?”आम्ही बोललो “नाही.” तो बोलला “मग लवकर जाऊन वाचा.”
आम्ही धावत गेलो सुचना फलकाच्या वर सुचना होती की “आपल्या कॉलेजची 11th आणि 12th वर्गांची 1/12/2019 ते 7/12/2019 रोजी केदारनाथ ,उत्तराखंडला ट्रिप जाणार आहे.त्या ट्रिपची फी ₹7000 आहे.जो कोणी ट्रिपला जाण्यासाठी इच्छुक असेल त्याने आपल्या वर्गशिक्षकां जवळ आपली नाव नोंदवावी.” आम्ही सगळे हि सुचना वाचताच खुश झालो होतो.परंतु सगळ्यांना एक प्रश्न होता की “आमचे पालक आम्हाला परवानगी देतील का?” आम्ही परत वर्गात जाऊन बसलो.काही lecture झाल्या नंतर आमचा कॉलेज सुटला.आम्ही सगळे एकमेकांना bye बोलुन घरी गेलो.परंतु सगळ्यांच्या मनात हाच विचार होता की परवानगी कशी घ्यायची.
(माझ्या घरातील संवाद)
मी=”आई,आमच्या कॉलेजची केदारनाथला ट्रिप जाणार आहे.तर मी जाऊ का?”
आई=”इतक्या लांब जाणार तु,मी तुला परवानगी नही देऊ शकत तु तुझ्या बाबांना विचार.”
मी=”बाबा मी आमच्या कॉलेजच्या ट्रिपला जाऊ का? त्याची फी ₹7000 आणि 6 दिवसांसाठी जाणार आहे.आमच्या सोबत 20 शिक्षक असणार आहे.माझ्या आयुष्यातील पहिली कॉलेजची ट्रिप आहे मला जाऊ द्या ना!आमचा सगळा कॉलेजचा ग्रुप पण जाणार आहे.”
बाबा=”ठिक आहे जा पण काळजी घे,ग्रुप सोडून जाऊ नकोस,शिक्षकांच्या संपर्कात रहा आणि खुप मज्जा कर.”
(माझ्याप्रमाणे सर्वांनाच परवानगी मिळाली परंतु वीणाला परवानगी मिळाली नाही)
आम्ही पुढच्या दिवशी कॉलेजला गेलो.वीणाला विचारल, “काय झाल तुझ्या बाबांनी तुला परवानगी का नाही दिली?”ती बोलली “बाबा बोलले की तु एकटीच इतक्या लांब कशी जाणार.आज काल मुली बाहेर सुरक्षित नाही. मला तुझी फार काळजी आहे. मी तुला एकटाच कसा पाठवु? आणि असा पण नाही की एका दिवसाची ट्रिप आहे तुम्ही तर 6 दिवस जाणार आहात.”
त्यांचं बरोबर आहे. पण आम्ही पण आहोत शिक्षक पण आहेत आपल्या सोबत.आपण आपल्या वर्ग शिक्षकांना सांगू तुझ्या बाबांशी बोलायला.आम्ही आमच्या वर्ग शिक्षकांना सांगितल ते बोलले “ठिक आहे मी बोलतो पण मी त्यांना जबरदस्ती नाही करु शकत की वीणा ला ट्रिप ला पाठवा.”त्यांनी वीणा च्या बाबांना फोन लावला.
सर= “नमस्कार मी वीणाच्या कॉलेज मधुन बोलतोय.मला तुम्हाला ट्रिपच्या सेफ़्टीच्या बद्दल सांगायच आहे.”
वीणा चे बाबा=”पण वीणा ट्रिप ला नाही येणार आहे.”
सर=”तुम्ही ऐकुन तरी घ्या.आम्ही येथून एकुण 80 मुला व 20 शिक्षक जाणार आहोत.आम्ही त्यांच्या सुरक्षिततेची खुप काळजी घेतली आहे.मी तुम्हाला शब्द देतो की कोणालाही काहीच चिंता करायची गरज नाही.कॉलेज व कॉलेज शिक्षकांकडुन प्रत्येक मुलाची काळजी घेतली जाईल.”
वीणा चे बाबा=”ठिक आहे मी विचार करुन सांगतो."
असे बोलुन त्यानी फोन ठेवला. सर आम्हाला बोलले “माझ्या कडुन जेवढा होत होत तेवढा मी केला.”
काही वेळानी कॉलेज सुटला व आम्ही गेलो.घरी जाताच काही वेळानी मला वीणा चा फोन आला ती बोलली “मला बाबांनी परवानगी दिली.”मी खुप खुश झालो कारण आता आमचा संपुर्ण ग्रुप ट्रिपला जाणार.
(क्रमशः)