कॉलेज 5
कॉलेज 5


कॉलेज सुरु होऊन आता फार दिवस उलटून गेले होते आणि आमची मैत्री ही तेवढीच घट्ट झाली होती.अभिषेक आम्हाला नेहमीच त्रास द्यायचा परंतु आम्ही त्याचे डाव प्रत्येक वेळी परतुन लावायचो.आमच्या कॉलेजमध्ये एकदा नृत्य स्पर्धा होती.त्यात प्रज्ञाने भाग घेण्याचे ठरवले.अभिषेकने व त्याच्या ग्रुपने ही त्या स्पर्धेत भाग घेतला.अभिषेकने प्रज्ञाला आव्हान दिले की “मला स्पर्धेत हरवून दाखव.”प्रज्ञाने ते आव्हान स्विकारला.
दोघेही उत्तम नृत्य करायचे.दोघांनीही सराव करायला सुरुवात केली.हळूहळू स्पर्धेचा दिवस जवळ येत गेला.दोघांचा ही सराव जोरात चालू होता.अभिषेक ने विचार केला की “चुकुन जर का मी हरलो तर माझी सगळीकडे शोभा होईल.मला काहितरी केले पाहिजे जेणेकरून मी हरणार नाही.काय करु?,काय करु? हा सुचलं.मी तिचा पोशाख लपवून ठेवेन.”हे सगळा बोलना राज लपुन ऐकत होता.
राज ने त्याचे सगळे बोलने आम्हाला येउन सांगितले. पण तेव्हा तिथे प्रज्ञा नव्हती ती सराव करण्यात व्यस्त होती.आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो.राज बोलला “त्याने आपल्याला त्रास द्यायचा ठरवला आहे आता आपण त्याला थोडा त्रास द्यायचा.”आम्ही त्याला विचारलं “पण कसा?” तो बोलला “मी सांगतो इकडे या!..”
बोलता बोलता स्पर्धेचा दिवस आला.आम्ही त्या दिवशी कॉलेजला लवकर आलो होतो.आम्ही ठरवल्या प्रमाणे आम्ही पहिल्यांदा प्रज्ञाच्या पोशाखाच्या जागी वेगळा पोशाख ठेवला आणि तिचा पोशाख आम्ही आमच्या कडे ठेवला.नंतर काही वेळाने अभिषेक तिथे आला आणि costume room मध्ये गेला.तो काही वेळाने एक पिशवी घेवुन बाहेर आला.आम्ही हे सगळं लपुन पाहत होतो.परंतु ह्या सगळ्या बद्दल प्रज्ञाला काहीच माहीत नव्हते.
तो जाताच आम्ही परत costume room मध्ये गेलो.तिथे आम्ही बघितला की आम्ही ठेवलेला प्रज्ञाचा पोशाख तिथे नव्हता.सगळा आम्ही ठरवल्या प्रमाणे होत होता.आम्ही प्रज्ञाच्या पोशाखाच्या जागेवर तिचा पोशाख ठेवला आणि अभिषेकचा पोशाख घे
ऊन आम्ही बाहेर येत होतो.तेवढ्यातच आमच्या समोर आमचे वर्गशिक्षक आले.त्यानी आम्हाला विचारल “काय रे मुलांनो येथे काय करतायत?”तेवढ्यात परेश बोलला “सर आम्ही प्रज्ञाचा पोशाख बघायला आलो होतो.”सर बोलले “ठिक आहे आता बाहेर जा आणि प्रज्ञा ला best of luck सांगा.”
मग आम्ही तेथून बाहेर पडलो.मी बोललो “नशीब सरांनी आपल्याला पोशाख घेताना पाहीला नाही. मी तर खुप घाबरलो होतो.आपला सगळी योजना यशस्वी झाली.” आता आम्ही सगळे प्रज्ञाचा डांस पाहण्यासाठी खुर्ची वर जाऊन बसलो.काही वेळेत स्पर्धेला सुरुवात झाली.काही डांस झाल्या नंतर प्रज्ञाचा डांस सुरु झाला.तिचा डांस खुप छान झाला आणि सगळ्याना आवडला.थोड्या वेळात अभिषेकच्या ग्रुप चा डांस सुरु झाला.सगळ्या ग्रुप चे कपडे सारखे आणि अभिषेक चे कपडे वेगळे होते.त्यांचा ही डांस चांगलाच झाला.आता वेळ आली ती म्हणजे बक्षीस वितरणाची.सगळे परिक्षक व्यासपीठावर आले त्यानी प्रथम पारितोषासाठी प्रज्ञाचे नाव घेतले.आम्ही सगळे हे बोलताच खुश झालो आणि जोरात टाळ्या वाजवल्या.परंतु अभिषेकला बक्षीस मिळाला नाही.
पारितोषिक वितरण समारंभ समाप्त होताच प्रज्ञा अभिषेक जवळ गेली आणि बोलली “अभिषेक पारितोषिक नाही मिळाल म्हणून नाराज नको होऊ तुझा पण डांस छानच होता आणि आव्हान च काय आज मी जिंकली उद्या तु जिंकशील स्पर्धेत हार जित होतच असते.”तो तिला बोलला “जा जा जिंकलीस म्हणून जास्त बोलू नको आज हारलो पण पुढच्या वेळी मी सुद्धा जिंकेन.”हर्ष मध्येच बोलला “तुझा हाच माज उतरवण्या साठी आम्ही तुझा पोशाख लपवला होता.प्रज्ञा तुला माहीत नाही ह्यानी जिंकण्यासाठी तुझा पोशाख लपवुन ठेवलेला परंतु जो त्याने लपवला तो पोशाख वेगळाच होता तो आम्हीच त्याला फसवण्यासाठी ठेवलेला तो जाताच आम्ही परत तुझा पोशाख तुझ्या जागेवर ठेवला आणि ह्याचा पोशाख आम्ही घेतला आणि लपवला.”प्रज्ञा त्याला बोलली “मी तर तुला माझा चांगला मित्र समजत होते पण तु जिंकण्यासाठी ह्या थरला जाशील अस वाटला नव्हता.तु माझा पोशाख लपवणार होतास आता तुझा पोशाख हरवला तर तुला कसा वाटला.म्हणुन कधीही कोणाचाही वाईट बघु नये.”पण ह्याचा अभिषेक वर काही फरक नाही पडला तो तेथुन निघुन गेला.
(क्रमशः)