कॉलेज 4
कॉलेज 4


आता आम्हाला आव्हान होते ते म्हणजे कुणालला खर सिद्ध करुन दाखवायचे. आम्ही कॉलेज सुटल्यानंतर घरी न जाता काही काळ कैंपस मध्ये थांबलो आणि काय करता येइल या बद्दल विचार करत होतो. त्याच वेळी प्रज्ञाने कुणालला विचारल “तुझ्या आजूबाजूला कोण कोण बसलेलं त्यांना विचारुन बघू या की त्यांनी अभिषेकला तो कागद तुझ्या बेंचवर टाकताना बघितला का?”
कुणाल बोलला की “माझ्या आजुबाजुला जयेश, अक्षय, साहिल आणि सानिका हे बसलेले. त्यांना आपण कॉल करुन विचारु या.”कुणाल ने पहिल्यांदा जयेश ला कॉल केला तो बोलला “मी नाही पाहीलं, मी माझा पेपर लिहित होतो.” त्या नंतर त्याने अक्षय आणि साहिलला कॉल लावला परंतु त्याचं पण उत्तर हेच होते. आता एकच व्यक्ती बाकी होती ती कुणालला वाचवू शकत होती.
कुणालने आता सनिका ला कॉल केला ती बोलली “मी पाहिलं त्याला तो कागद टाकताना पण मी जर हे मुख्याध्यापकांना सांगितल तर अभिषेक मला काही करणार तर नाही ना?” आम्ही तिला समजावला की “तुला तो काही करणार नाही, तू सांगितलसं तर कुणालला विनाकारण शिक्षा मिळणार नाही. आम्ही तुला विनंती करतो. ”तिचाही आत्मविश्वास वाढला ती बोलली “ठिक आहे मी उद्या मुख्याध्यापकांना सांगेन.”काही वेळानी आम्ही सगळे घरी गेलो.
पुढच्या दिवशी आम्ही वेळेच्या आधीच कॉलेजला आलो. कुणाल अजुन त्याच गोष्टीचा विचार करत होता. तेवढ्यात समोरुन अभिषेक आणि त्याचा ग्रुप येताना दिसला. तो आमच्यासमोर येउन कुणालला बोलू लागला की “मी तुला पेपर लिहीताना तुला उत्तर विचारायचो तेव्हा तू दुर्लक्ष करायचा मला तुझा खूप राग यायचा म्हणून मी ठरवलं की तुला त्रास द्यायचा म्हणून मी ती चिठ्ठी सर जवळ येताच तुझ्या बेंचवर टाकली. ”कुणालने त्याला उत्तर दिलं “तू कोणत्याही पेपरला अभ्यास करुन नाही येत. मी का तुला उत्तर दाखवायचं. नाही तेव्हा तू लेक्चरला न बसता कॉलेजच्या कैंपसमध्ये फिरत असतो अभ्यास तर कधी करत नाही. आता सानिका तुझ्याबद्दल सरांना सांगणार आहे की तू ती चिठ्ठी माझ्या बेंचवर टाकलेली.” (अभिषेक हे ऐकून रागातून तिथून निघुन गेला) तो जाताच सानिका आली.
आम्ही तिला लागलीच मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये घेउन गेलो. तिने न घाबरता सगळी हकीकत मुख्याध्यापकांना सांगितली. मुख्याध्यापकांनी ताबडतोब अभिषेकला बोलावलं आणि त्याला विचारलं की तू कुणालच्या बेंचवर हा कागद टाकला होतास. मुख्याध्यापकांना घाबरुन तो खरं बोलला. मुख्याध्यापकांनी त्याला उद्या त्याच्या पालकांना सोबत आणण्यास संगितले. आम्हाला मुख्याध्यापकांनी “वर्गात जा आणि अभ्यास करा” असे सांगितले.
बाहेर येताच आम्ही सगळ्यांनी सानिकाचे आभार मानले व तिलाही आम्ही आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट केले. तेवढ्यात अभिषेक ऑफिसमधून बाहेर आला. तो बोलला “आता तर तुम्ही सुटलात. आधी माझा फक्त कुणालवरच राग होता आता तुमच्या सगळ्यावर माझा राग आहे सो वेट अँड वॉच.”
(जर आपल्या समोर कोणा निरपराध व्यक्तीला शिक्षा मिळत असेल तर आपण त्याला वाचवायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण उद्या आपण त्याच जागी उभे असलो आणि आपल्याला कोणीही मदत केली नाही तर आपल्याला कसे वाटेल.)
(क्रमशः)