Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF
Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF

krishnakant khare

Others


4.3  

krishnakant khare

Others


कन्यादान

कन्यादान

6 mins 2.0K 6 mins 2.0K

 कन्या म्हणजे आपल्या आई वडिलांची मुलगी.  हीच मुलगी, कन्या म्हणून आई वडील तिला लहानाचे मोठे करतात तिच्या जीवनात येणाऱ्या गरजा भागवतात, वेळेवर संरक्षण करतात, एक जबाबदारी म्हणून तिची जबाबदारी तिचे संगोपण व्यवस्थित करतात, तिला कोणत्याच गोष्टीची कमी भासू देत नाहीत, प्रत्येक आई बापाला आपली मुलगी रक्ताचे नाते सांगून असते म्हणून कोणताही आई बाप आपल्या मुलीला तीचे संगोपन कसे होईल या कडे त्यांचे लक्ष असते मुलगी जस-जशी मोठी होते, तस-तशी बापाला आपल्या मुलीच्या आयुष्याबद्दल ,भविष्याबद्दल काळजी वाटते ,कारण प्रत्येक घरी हीच बोंब असते की आपली बहीण, आपली मुलगी वयात आली की भावाला, आई, बापाला त्या मुलीची काळजी वाटत असते, कारण मुलगीही कोणाची तरी बहिण असते, कोणाची तरी मुलगी असते आणि हीच मुलगी ती त्यांची समाजात इज्जत,अब्ररु असते म्हणून तिचे पाय घसरू नये,नाही तेच कुणाच्या प्रेमात पडु नये,तिला कोणत्याही वाईट सवय लागु नयेत म्हणून तिची फार काळजी घेतात.

तिच्या आयुष्याबद्दल तिच्या भविष्याबद्दल चिंता करतात आणि एकदा का तिचं लग्न झालं की निवांत होतात,आणि आता ते निश्चित होतात कारण मुलीच्या बापाने मुलीच लग्नात कन्यादान केलं असतं आता नवऱ्या मुलाला लग्नात कन्यादान म्हणून मिळालं वधुला धर्मपत्नी म्हणून संसार करायचं असतं. विवाह कार्यक्रमात जावयाला कन्या ती धर्मपत्नी म्हणून ते कन्यादान केले असते आणि भटजी समोर मंत्रोपचार करून त्याचा अर्थ सांगत असतो जसं जसं बापाने मुलीला पालन-पोषण केलं असतं तिचं संगोपन केलं असतं, तिला संरक्षण दिलं असतं, तसंच यापुढे वरमुलाला त्या मुलीचे कन्यादान करून त्या मुलाकडुन वचन घेतले जाते कायेने वाचेने,तनमनधनाने कन्यादानात मिळाले वधुला धर्मपत्नी म्हणून ती अर्धांगी म्हणून तिचे पालनपोषणाची जबाबदारी पिताकडून पती कडे आली. पण पिताने आपल्या पत्नी कडुन कन्येला अथवा मुलाला जन्म देण्याचे वंशसवर्धनचे जे कार्य केलेय ते कार्य नैतिक होण्यासाठी नवरीमुलीने आपल्या भावी पतीकडुन करायचा असतो असंं करुन आपल्या माहेरच्या व सासरच्या कुलपरंपरेला जपायचं असतं ह्याकामी तिच्यापतीने तिच्या पिताकडून कन्यादानकर्मधर्म करून घेतल्याने तिचा पतीही तिच्या सुखदुःखाची संसाराची जबाबदारी म्हणून संसार सुखाने चालवण्याचा प्रयत्न करतो, वचन म्हणून,एकामेकाच्या सुखादुखाला सहभागी होऊन आपला विवाहित जीवन सुखाने संसार करायच असतं. त्याप्रमाणे उभयतांच्या संसारात जावई मुलानी कन्यादान आलेल्या मुलीला बायको म्हणून आयुष्यभर धर्मपत्नी चा दर्जा देऊन तिचं संगोपन करणे तिचा अनिष्ट गोष्टीपासून संरक्षण करणे तिची देखभाल करणे आणि तिच्याबरोबर संसार सुखाचा करणे ,खरं म्हणजे पिता आपल्या मुलीचे पालनपोषण करतो पण मुलगी लग्नाची झाली म्हणजे तिलापण वंशसवर्धनाचा प्रश्न येतो पण तेच कार्य तिच्या पती शिवाय दुसरं कोणी करुच शकत नाही जर अशा काहीघटना लग्न न,करता,कन्यदान न करता घडल्या तर ते अनैतिक मार्ग होतो व अशा अनैतिक मार्गाला कुठेच थारा नसतो ,त्यापेक्षा मुलीचा बाप नवर्यामुलाला आपली कन्यादानाचे कार्ये करतो, त्यामुलीची,त्यावधुची जबाबदारी त्या नवर्यामुलीकडे टाकतो,हेच कार्ये करण्यासाठी लग्नात कन्यादानाला महत्त्व दिलंय...... पण आता कन्यादान विषय घेतला का, वर किंवा वधुला कमीपणाचा प्रश्नच येत नाही उलट मुलीचा बाप कन्यादानाचा कार्य करून मुलीच्या मोठ्या जबाबदारीने मुक्त होतो,नवर्यामुलालाही असं कन्यादानात नवरीमुलगी मिळल्याने नवरीमुलीला संभाळुन संसार करण्याची जबाबदारी वाढते.आणि तो नवरामुलगा संसाराची धुरा लिलीया पार पाडतो.लग्नातल्या शास्त्रीय पद्धतीने कार्य पार पाडताना नवरानवरीला आपल्या भावी संसाराची जबाबदारीची जाणीव व्हावी,आयुष्यात नवरीमुलगी नवर्यामुलाला दगाफटका देऊ शकत नाही कारण तीला आईबापानी जो कन्यादान केला असतो त्याचा त्या नवरीमुलीला मान ठेवायचा असतो,आणि ह्या सार्या गोष्टी लग्नकार्य करुन कायदेशीर झालेल्या असतात,म्हणून अशा गोष्टी मुळे नवरीमुलगी नवर्यामुलाबरोबर संसार करताना आत्मविश्वासाने वावरते,जरी नवर्यामुलाने काही विपरीत वागायला लागला तरी नवरीमुलगी आत्मविश्वासाने बोँलून पण दाखवते "कायदेशीर लग्न केलेय,कन्यादान केलेय माझं, आता नवरा म्हणून तुमची जबाबदारी नाही का?

मला काही बाहेरची आणलेली वगैरे समजु नका, आपलं सगळ्यानसमोर,देव ब्राम्हाणाच्या साक्षीने लग्न झालंय,मी काय अशीच नाही का आलेय"आणि खरंच इथेच बारीक लक्ष दिलं तर असं दिसून येईल कि कोणत्याही स्त्रीला बाहेरून आणली,रखैल ठेवली असे स्त्रीसत्वाला असे चरीत्रहनन शब्द आवडणार नाहीत म्हणून स्त्री सन्मान म्हणून, तीचा आदर म्हणून लग्नकार्य व कन्यादान पद्धत मानसिक शास्त्राआधार म्हणून आली असावी, आणि कोणताही बाप नवरामुलाला देवभितीमुळे कन्यादान करताना चांगल्यामुलीची निवड करण्यासाठी मी तो आधी आपल्या मुलींना चांगलं वळण लागेल चांगले संस्कार करेल सगळ्यात गोष्टी कन्यादानात करावे लागतात म्हणून मुलींना आधीपासुन संस्कारी बनवेल यासाठी प्रयत्न करेल .

 अठरा वर्षाच्यामुली शरिराने कधी कधी मनाने सुद्धा कमजोर असतात पण तेच मुलं पंचवीस वर्षाचे असल्याने मनाने आणि शरीराने परिपक्व झालेले असतात म्हणून वर मुलाचा मुलीवर तिचं संरक्षण करण्याचं पालन-पोषण करणं या जबाबदाऱ्या असतं.

पण हिच गोष्ट लग्नविधी काही प्रकार न करता मुलीला परक्या हाती देऊन वरवर नियम वगैरेचे सांगून कोणता नवरा मुलगा मनावर ती जबाबदारी घेणार नाही व त्याला काहीच महत्त्व त्याचं वाटणार नाही तो आपल्या मुलीला सुखीच ठेवील ह्याची गेरेंटी काय? म्हणुन मुलामुलीला हा लग्नाचा विधी त्यांच्या नातेवाईकां कडुन घ्यावाच लागतो. कोर्टामार्फत पण कन्यादानासारखंच एकदुसर्याला एकनिष्ठ राहण्याचे,एकदुसर्याला सुखी ठेवण्याचे म्हणुन कागदपत्रावर शपथ सह्या दोघांच्या घ्याव्याच लागतात.मग येथे लग्नाच्या नावाने सगळ्यांच्या साक्षीने, देव,ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न होतं कन्यादान होतं, सप्तपदी होतात अशा वेळी कन्यादानात मिळालेली वधुमुलगी असल्याने नवरामुलगा याचं आत्मविश्वासाने जबाबदारी सहजच घेतो , कारण लग्नतला कन्यादानाचा झालेला आत्मगौरव झालेला असतो आणि तो मिळालेला मानासाठी आणि खरोखरच जबाबदारी म्हणून वधुमुलीबरोबर संसार चांगला करतो.   

त्यातलं लग्नकार्य करताना कर्तव्य म्हणून जावई आपल्या बायको करता कर्तव्य पार पाडतो हेच कन्यादान यामुळे नवऱ्या मुलाला म्हणजेच जावयाला पुढची कर्तव्य त्याच्या बायकोसाठी त्याच्या संसारासाठी, करायचे असतात हेच ते काही कन्यादानाचे कर्तेव्ये असते.  हिंदू धर्मात या अशा लग्नाला अनन्य साधारण महत्व असतं कन्यादानाच्या गोष्टीमुळे जोडप्यांना नवरा नवरीला एक वेगळेच जीवनाची,संसाराची जबाबदारी आलेली असते. कन्यदान हा शब्द म्हणजे जर काहिकांना वाटत असेल कि स्त्री कमी लेखणाचा प्रकार तर तो चुकीचा समज आहे कन्यदान हा लग्नकार्यातला जिव्हाळाचा विधी आहे ,एका अर्थाने नवर्यमूलाला संसाराची जबाबदारीची जाणीव करण्याचा आहे,लग्नाआधी बापाने आपल्या मुलीला प्राणापलिकडे जपले असते,संगोपण केले असते,तेच कार्ये कन्यादान करून बाप आपली जबाबदारी जावई होणार्या मुलाकडे देतो,मग आपण ह्याला कन्यादान म्हणतो पण मला वाटते कन्यादान हा शब्द सारुन कन्यादानाला कन्यावचन म्हटलं तरी चालेल म्हणजे हिंदू लग्नपद्धतीला कन्यादानाचं कन्यावचन हे शब्द सोपस्कर वाटेल, कुठेच प्रोब्लेम होणार नाही,ज्याला वाटते त्यांनी कन्यादान ह्या शब्दाऐवजी कन्यावचन हा शब्द वापरावा नाही तर ज्यांना पटेल तसं .

 आपल्या भारतात ठिकठिकाणच्या राज्यात कन्यादानाची प्रथा ठिकठिकाणी वेगळे दिसते प्रत्येक राज्यात ही प्रथा वेगळीच असते पण कन्यादान हा विषय एक उद्देश एक कर्तव्य आता मुलीच्या बापानंतर जावई मुलाला पार पाडायचे असतात पण बरेच ठिकाणी कन्यादानाचे नावाखाली कन्यादानाबरोबर सासऱ्या कडून नवर्या मुलांकडून पैशाची मागणी होते, गाडीबंगल्याची सुद्धा मागणी होते, काही काही ठिकाणी कन्यादानाबरोबर प्रचंड पैशाची मागणी होते त्यामुळे हवालदिल झालेले मुलीकडचे बाप सगळ्यांना चिंता लागून राहिलेली असते.  पुर्वी तर हा प्रकार भारतात खेड्यागावात विशेषतः फार प्रमाणात बोकाळला गेला होता पण जनजागृती झाल्याने आणि हुंडा देणेघेणे कायदेशीर गुन्हा असल्याने त्यावर बंदी घातली गेली. कन्यादानाची पद्धत तशीच ठेवून हुंडा पद्धती बंद झाल्या आहेत. कन्या दानामुळे मुलीचा बाप ्त्यांची मुलीची जबाबदारी संपल्याने ती जबाबदारी मुलीच्या नवर्याकडे कन्यादान करून अर्थात कन्यावचन देऊन मुलीचा बाप मोकळा होतो,पण तरीही मानसिकदृष्ट्या येथे बापाने मुलीला दोन धीराचे शब्द बोलायचे असतात" जरी कन्यादान करून नवर्याची झालीस, तरी बाप म्हणून तुला माझा कायमचा आधार असणार आहे,कन्यादान केलेय खरं पण ते कन्यावचन आहे मात्र सत्य." 

मुलगी आपल्या सासरी संसार करायला बघते, जर का कन्यादाना नंतर हुंड्याचा पुरेसा पैसा-अडका नाही मिळाला तर अशा मुलीची अवश्य छळ करत. शहरापेक्षा खेड्यात हुंडा पद्धत काहीकाही ठिकाणी पहायला मिळते. ज्याना नुसत्या मुलीच असतात त्यांना हुंडा घेण्याचा प्रश्नच येत नाही पण ते आपल्या मुलीसाठी हुंडा देऊन बेजार झालेले असतात काही ठिकाणी हि गोष्ट पराकोटीला जातो कधी मुलगी,कधी बाप आपल्या जीवाचं बरेवाईट करतो.पण असे स्वताचं बरेवाईट न करता सरळसरळ अश्यांवर पोलिसी कारवाई करायची असते.. हुंडापद्धत पुर्णतःबंदच झाली पाहिजे.त्यामुळे अशा अनिष्ट प्रथा राहणार नाहीत. पण लग्नात कन्यादान हि पद्धत लग्नाला पुरक असल्याने,त्यात वरवधुला संसाराला लागणारी भांडीकुंडीवस्त्र दान म्हणून नवर्यामुलाला नवरीमुलीसाठीच देत असतो. कन्यादानात नवर्यामुलाला मुलीचा पुढील पालनपोषण, संसार गुण्यागोविंदाने चालविण्याची वचनं नवरामुलगा वधुच्या वडीलांना देतो,म्हणून येथे कन्यादान ऐवजी कन्यावचन हा शब्द वापरला तर........Rate this content
Log in