कला (अलक)
कला (अलक)
1 min
257
अरे, इथं आज एवढी गर्दी कशी काय, एवढी का लोकं जमाव करून उभी आहेत असा प्रश्न अल्काच्या मनात आला आणि स्टँडवरून ती तातडीने समोरच जमाव झालेल्या लोकांच्या गर्दीत शिरली,आणि पाहते तर काय एक छोटीशी हात नसलेली मुलगी पायाने चित्र काढत होती, आणि तेही समोर आलेल्या प्रत्येकाचं..
खरंच तो दयाळू परमेश्वर पृथ्वीवर जन्म घेताना कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाही,नाही का!
