खरंतर मला डायरी लिहायची सवय ना
खरंतर मला डायरी लिहायची सवय ना


खरंतर मला डायरी लिहायची सवय नाही..
तिने लावली मला सवय तशी...
म्हणजे आपणहून नाही लावली, पण तिच्यासोबत घालवलेला एक एक क्षण मला डायरीत जपून ठेवावासा वाटायचा...
अगदी माझ्या कुठल्या वाक्यावर तिने बट मागे घेतली, कुठल्या वाक्यावर हसली, इतका तपशील लिहायचो त्यात मी...
ती एक डायरीच होती माझी खरं सांगायचं तर....
जिच्याशी मनातलं सगळं बोलावंसं वाटतं अशी...
Spiral Binding केलेल्या शुभ्र कागदांवर शाई च्या पेनाने कोरले होते आमच्यातले एक एक क्षण..
तो कागदही शहारायचा त्यावेळी....
निम्म्याहून अधिक भरली असेल डायरी माझी...
खरंतर सगळं व्यवस्थित चाललं होतं हा...
पण नंतर तिनेच माझ्याकडे बघून वेणी पुढे-मागे करणं सोडून दिलं...
आणि मी लिहणंही.....
आम्ही 'मोठे' झालो...
मला मात्र डायरीतली ती आवडते...
बट मागे घेणारी... माझ्या फुटकळ विनोदांना पोट दुखेपर्यंत हसणारी...
हल्ली मात्र ती 'ऑफिशियल' हसते...
कारण, आम्ही मोठे झालो...
डायरीत business मधल्या share market च्या नोंदी असतात...
कारण, आम्ही मोठे झालो...
आता ती स्वयंपाकघरात, मी हॉल मधे..
ती कुकर लावते.. मी लॅपटॉप वर असतो...
डायरी असते, कुठल्याशा कपाटात...
ती अजून मोठी झाली नाही इतकंच.....