Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Ravindra Gaikwad

Others


3  

Ravindra Gaikwad

Others


खरी मैत्री..

खरी मैत्री..

1 min 47 1 min 47

मैत्री म्हणजे मैत्री... मैत्री म्हणजे विश्वास... मैत्री हवी जीवा शिवाची... कृष्ण सुदाम्याची... रक्ताच्या नात्यापलीकडले नाते म्हणजे मैत्री. मैत्रीचा प्राण आहे विश्वास... गैरसमज नी अविश्वास हे मैत्रीचे खरे शत्रू... मैत्रीत व्यवारिक्ता अजिबात नको... उपकार,स्वार्थ, नफा, तोटा, हिशोब तर अजीबात च नको मैत्री ही नि:स्वार्थच असते नी नि:स्वार्थच हवी... मैत्री म्हणजे आत्म्यांचं नातं... मैत्री ही उघड्या डोळ्यांनी नाही तर डोळे झाकून असावी... मैत्री हा धर्म हवा.. मैत्रीत ना उपकार,ना आभार,ना धन्यवाद... खरीखुरी आत्मीयताच मैत्रीत हवी.गरज सरो नी वैद्य मरो ही मैत्री नव्हे.शहाण्याने जीवाला जीव देणारे मित्र जोडावे असे म्हणतात...असा मित्र ज्याला लाभला तो भाग्यवानच... मैत्री जीवन घडवू, बिघडवू शकते...??नव्हे घडवूच शकते.. मैत्री एक नाजूक बंधन आहे... त्याला खूप खूपच जपावं लागतं...जी जपली जाते ती मैत्री...जी टिकली,टिकवली जाते ती मैत्री...जी अबाधित राहते ती मैत्री..जी तुटतच नाही ती मैत्री...खरी मैत्री बंधुत्व जोपासते. भावाभावात नसेल तेवढं प्रेम, विश्वास मैत्रीत असतो...बस्स अजून काय असावं ? मैत्री ही मैत्रीच असते.मैत्री टिकवावी नाही टिकावी लागते.मैत्री लाभावी लागते.

  आईनस्टाईन ला मुलाखतीत प्रसारमाध्यमांनी विचारलं तू एवढा मोठा, तुला अजून काय हवं ? तुला काय मिळालं नाही ? त्यावेळी तो म्हणतो मला दोस्ती करता आली नाही... मला खरा दोस्त भेटला नाही... पुढच्या जन्मी मी खरी दोस्ती करेन , चांगला दोस्त बनवेल...

खऱ्या दोस्तीला सलाम,प्रणाम..!!!!


Rate this content
Log in