खरे जीवन
खरे जीवन
आनंदात रहावे आनंदी जगावे
यापेक्षा वेगळे जीवन नसावे ll 1ll
काही सुखाचे तर,
काही दु:खाचे,
धागे नित्य जिवनात गुंफित जावे ll
निराशेची रात्र काळी,
आशेची नवी झळाळी,
स्वप्न चांदणे यशाचे नित्य शिंपीत जावे ll
अश्रृच्या बेफाम धारा,
कधी सुखाचा उनाड वारा,
चंचल मन नित्य स्थिर करावे ll
उद्विग्न मनाची काहूर,
कधी शांततेची धुसर चाहूल
तरी हास्य मुखी सदा असावे ll
चित्ताचा कोणता ठाव तो,
भक्तीचा कोणता भाव तो,
मनी आनंद हिंदोलित रहावे ll
जगी असुनी तु एकला,
'मी' चा अहंकार दाटला,
इतरांमुखी कधी हस्य खुलवावे ll
हा जन्म पुन्हा कधी,
असेल खरचं किंवा नसेल कधी,
जन्मातरीच्या आनंदप्रवासाला नित्य स्मरावे ll
