काळजी घ्या.
काळजी घ्या.
"काळजी घ्या" हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत.
काळजी घ्या कशा कशाची काळजी घ्या??
काळजी आपल्या आरोग्याची घ्या.
काळजी वाहन चालवताना घ्या.
काळजी स्वयंपाकाचा गॅस चालवताना घ्या.
काळजी मुलं खेळताना पडू नयेत म्हणून घ्या.
काळजी मुलांना काय खायला द्यावं, प्यायला द्यावं याची घ्या.
घरातील टोकदार वस्तू लहान मुलं खेळत नाहीत ना याची काळजी घ्या.
नवरा बायकोने एकमेकांची काळजी घ्या. यात आरोग्य आलं, एकमेकांचे संबंध आले, आणि कौटुंबिक वाद,विवाद,संवाद सर्व आलं.
काळजी मित्रांशी वागताना घ्या. जो खूप जवळचा आहे त्याच्याशी मनातले सर्व बोला. आणि जो हात राखून मैत्री करतो त्याच्याशी जेवढ्यास तेवढे बोला. सर्वच आपल्या मनातल्या खास न्यूज जर का आपण आपल्या मित्रांना सांगितल्या तर त्यातही काही मित्र असे असतात की आपली खिल्ली उडवतात आणि काही मित्र आपल्याला सपोर्ट करतात. जवळचा मित्र दूरचा मित्र आणि बोलायचे म्हणून बोलणारा मित्र समजला पाहिजे आपल्याला. आजकाल इंस्टा, व्हाट्सअप, फेसबुक या सर्वांमुळे मैत्री वाढत चालली आहे पण हे मैत्रीचे संबंध कोणाशी प्रस्थापित करायचे हे आपल्याला अचूक कळले पाहिजे म्हणून काळजी घ्यायची आहे.
काळजी आपल्या वृद्ध आई-बाबांची,आजी आजोबांची घ्या. त्यांच्याशी येता-जाता बोला आपल्याला वेळ नसेल तरी पाच दहा मिनिटे दिवसातले त्यांच्याशी बोला, काय हवं नको विचारा जेवलात का विचारा बास एवढेच त्यांना लागतं. त्यांच्या खोलीत त्यांचा खाऊ काढून ठेवा वेगळा म्हणजे ते आपल्या किचनमध्ये येऊन इकडे तिकडे हात लावणार नाहीत डबे सांडणार नाहीत डब्यातला खाऊ सांडणार नाही.
वृद्धांचे हात थरथर कापत असतात त्यासाठी त्यांना त्यांच्या हातात आपण वस्तू देणार हे फार महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी अगदी पाच दहा मिनिटे लागत असतात ते काम आपण केलं की त्यांची आपण काळजी घेणं हेच होतं.
आपल्या घरातील झाडाझुडपांची, परिसराची काळजी घेतली असता रोगराई पसरत नाही. स्वच्छता ठेवली असता दिसायलाही छान दिसतं आणि आजार होणार नाहीत.
आपल्या परिसराची आपल्या झाडांची निगा ठेवायची, काळजी घ्यायची याचा अर्थ काय तर वेळोवेळी झाडाची कटींग करण, त्यांना खत घालणं,झाडांना पाणी घालणं त्यांच्या वाढी कडे लक्ष ठेवणं. झाडाझुडपांवर प्रेम करणं. इत्यादी गोष्टी या आपल्या काळजी घेण्यामध्ये येतात.
घरातील विजेचा वापर आणि पाण्याचा वापर सुद्धा मुबलक करावा म्हणजे त्या वस्तूंची काळजी घेणं हे झालं नाही का!
आपल्या घरातील वाहनांची आपण काळजी घेतली तर वाहने आपली व्यवस्थित चालतात. दरवेळेला त्याला पेट्रोल पाणी बघितलं पाहिजे. चाकात हवा पाहिली पाहिजे. वाहनांना स्वच्छ केल पाहिजे. मग वाहने रुसणार नाहीत आणि छान चालतील.
एक साधे उदाहरण देते.परवा माझ्या मुलीने उंच टाचेची चप्पल घातली होती. बऱ्याच दिवसांनी ती पायात घातल्यामुळे तिला ती सहन झाली नाही. दोन्ही पायाला गोळी आले व तसेच टाचेला काळ-निळ झालं. तर हे का झालं तर चप्पल नीट काळजीन बघून घेतली नाही. फॅशनच्या दुनियेत राहून चालणार नाही तर आपल्या पायाला योग्य मऊ आणि त्रास होणार नाही अशी चप्पल घालता आली पाहिजे. म्हणजेच चप्पल सुद्धा काळजीपूर्वक निवडली पाहिजे.
अशी कितीतरी उदाहरण आपल्याला देता येईल की प्रत्येकाची आपण काळजी घेतली पाहिजे.
वसुधा नाईक, पुणे.
मो. नं. 9823582116
