Jyoti gosavi

Others

5.0  

Jyoti gosavi

Others

ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक

3 mins
1.0K


ज्येष्ठ नागरिक ही आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे आणि समस्या पण आहे .कारण निरनिराळ्या शोधांमुळे आजारांवर मात केल्यामुळे माणसाचे आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे राष्ट्र पुढे अशी समस्या आहे, या व्यक्तींकडून प्रॉटडक्टिविटी झिरो असते. म्हणजे निव्वळ बसून खाणाऱ्यांची संख्या वाढलेली असते .

एक ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो ज्येष्ठ नागरिक दिन  न होता त्यांना आदराची, प्रेमाची ,आणि सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे त्यासाठी शासनाने विविध योजना आखलेल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या उत्पन्नातून किंवा त्यांच्या मालमत्तेतून स्वतःचा उदरनिर्वाह चालवू शकत नसतील तर त्यांना कलम 5 प्रमाणे ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण यांच्याकडे अर्ज करता येतो. साधारणता 58 ते 65 65 ते 75 आणि 75 वरील गट अशा गटात त्यांना सुविधा दिल्या जातात. शिवाय मुलांनी न सांभाळल्यास त्यांना कायद्याने आई-वडिलांना भत्ता द्यायला पाहिजे  जर मुले सांभाळत नसतील तर आई-वडील आपल्या प्रॉपर्टी मधून मुलांना बेदखल करू शकतात  

वृद्धांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजनेअंतर्गत वृद्धाश्रमाची सोय देखील केलेली आहे शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे .श्रावण बाळ योजनेअंतर्गत निराधार वृद्धांना महिना 600 रुपये पेन्शन दिली जाते संजय गांधी निराधार योजना ,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन ,इत्यादी योजना आहेत. त्यांच्यासाठी वेगळे "नाना-नानी "पार्क उभे केले आहेत कोणत्याही सरकारी कार्यालयात त्यांना लाईन नाही बसच्या आणि रेल्वेच्या गाड्यांमध्ये भाड्यामध्ये त्यांना 40%सवलत दिली जाते


आपली भारतीय संस्कृती आणि कुटुंब व्यवस्था ही आदर्श मानली जाते. आपल्याकडे तीन पिढ्या गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात, मुले पाळणाघरात न ठेवता आजी-आजोबांच्या देखरेखीखाली आणि संस्कारात वाढतात .पण कुठे कुठे आता पाश्चात्त्यांचा प्रभाव जाणवू लागला आहे एक दीड कोटीचे घर घ्यायचे , त्यामध्ये राहायला कोण नसते आईबाप वृद्धाश्रमात, मुले पाळणाघरात आणि दोघे नोकरीवर अशी परिस्थिती आपल्याकडे आहे त्यामुळे प्रत्येक घराला उंबरा हवा, अंगणात तुळस हवी, आणि संस्कार करायला आजी आजोबा हवेत


ज्येष्ठ नागरिकांनी देखील आपल्या वागणुकीतून काही पथ्ये पाळावीत .आपल्या वागणुकीतून एक प्रकारची निवृत्ती जाणवायला हवी. मुलाला आणि सुनेला न विचारता सल्ला देऊ नये त्यांच्या भांडणांमध्ये लक्ष घालू नये .उगाचच कोणा एकाची बाजू घेऊ नये, नातवंडांच्या तक्रारी करू नये त्यांची फॅशन त्यांचे कपडे यावर टीका करू नये साऱ्या गोष्टींकडे साक्षीभावाने बघता आले पाहिजे. आपल्या जुन्या लोकगीतातील एक ओवी सांगते

"आपुल्या त्यासोन्यासाठी चिंधी करावी जतन 

आपुल्या त्या मुलासाठी सुन म्हणावी रतन "(रत्न)

जमेल तशी मुलाला आणि सुनेला त्यांच्या कामात मदत करावी उदाहरणार्थ नातवंडांना शाळेत सोडणे ,स्कूल व्हॅन पाशी नेऊन सोडणे सुनेला भाज्या वगैरे कापून देणे, लसूण सोलणे इत्यादी


 अजून एक सल्ला म्हणजे प्रथम स्वतःचे शरीर जपावे, औषध पाणी वेळेवर घ्यावे, जेणेकरून आपल्या मुलाला आणि सुनेला दवाखान्यात धावपळ करावी लागू नये त्यांना त्रास नको आपण आडवे पडलो तर आपलेच हाल होतील हे लक्षात ठेवावे.

आपल्या मृत्यूनंतर मुलांमध्ये वाद होऊ नये म्हणून मृत्युपत्र करावे. मात्र मरण्याआधी कोणती संपत्ती कोणाला देऊ नये.

ज्येष्ठ नागरिक ग्रुप जॉईन करावा. थोडा योगा करावा, हलकाफुलका व्यायाम करावा ,एखादा छंद जपावा. अजून मधून वृद्धाश्रम यांना भेटी द्याव्या जेणेकरून त्यांनाही बरे वाटेल आणि त्यांच्यापेक्षा आपण खूप छान स्थितीत आहोत असे तुम्हाला वाटेल.


"वृद्धत्वी निज शैशवास जपणे"


मुलांसाठी सल्ला


म्हातारपणी माणूस पुन्हा एकदा लहान होतो, हट्टी होतो , अटेंशन सिकिंग टेडेन्सी असते अशावेळी जेव्हा तुम्ही कामावरून घरी याल तेव्हा आधी तुमच्या मुलांची पत्नीशी बोलणे, चहापाणी इत्यादी झाल्यानंतर तुमच्या घरातील वृद्ध माणसांना आठवणीने भेटा ,त्यांच्याशी दोन शब्द बोला त्यांची आस्थेने चौकशी करा या वयात त्यांना फक्त प्रेमाची अपेक्षा असते बाकी काही नको असते


Rate this content
Log in