Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

ज्ञानेश्वरीच्या जयंती निमित्त

ज्ञानेश्वरीच्या जयंती निमित्त

2 mins
196


"भगवंताने भगवद्गीता गीता

 सांगितली जी पार्थला

 तीच गीता प्रगट केली

 ज्ञानेश्वराने जगताला 


किंवा 

"ज्ञानदेव बाळ माझा

 सांगे गीता भगवंता

 लक्ष द्या हो विनविते 

मराठी मी त्याची माता"


 हे आशाबाईंनी अजरामर केलेले गीत ,या व्यतिरिक्त ज्ञानेश्वरी वाचण्याचा कधी योग आला नाही. 

आता सगळीकडे  भगवद्गीता विकायला असते ,अनेक भाषेंमध्ये अनुवाद केलेली भगवद्गीता, अगदी रेल्वे स्टेशनवर देखील "हरे रामा हरे कृष्णा" वाले विकताना दिसतात. परंतु अशी ज्ञानेश्वरी विकताना कोणी दिसत नाही .

त्यामुळे ती सर्वसामान्य लोकांमध्ये सुलभपणे पोहोचत नाही. 

ज्ञानेश्वरी माहित नाही, असा मराठी माणूस विरळा , सर्वांना माहिती असते. 

पण ज्ञानेश्वरी वाचणारे फार कमी असतात. 


प्रथम ज्ञानेश्वर शाळेमध्ये भेटले ते "पसायदानामध्ये" आणि नंतर लताबाईंनी आपल्या अभंगांमध्ये अजरामर केले .त्यामुळे थोडीफार ज्ञानेश्वरांच्या साहित्याची गोडी लागली. 


ज्ञानेश्वरी म्हणजेच "भावार्थ दीपिका"

 जी जनसामान्यांमध्ये प्राकृत भाषेमध्ये आणली


 थोडक्यात संस्कृत मधील गीता प्राकृत मध्ये आणण्याचे, आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचे काम ज्ञानेश्वरांनी केले आहे. 

किंवा ज्ञानेश्वरी हे पुराण उपनिषद गीता या सगळ्यांचे मंथन करून काढलेले लोणी आहे.

ज्ञानेश्वरी लोकांनी देव्हाऱ्यात बासनात गुंडाळून पूजेला ठेवली. डोक्यावर घेतली, पण डोक्यामध्ये काही शिरली नाही. 

कारण आता प्राकृत भाषा देखील आपणास अवघड वाटते. ज्ञानेश्वरी हे मुळात आचरणात आणण्याची तत्वज्ञान आहे. 


अनेकांनी ज्ञानेश्वरी ची अनेक पारायण केली असतील. 

परंतु ती समजून घेतली नाही ,आणि पारायणाची मुदत असल्यामुळे , भराभर फक्त वाचून काढली. 

ज्यांना ज्ञानेश्वरी उमगली त्यांना ती आचरणात आणता आली नाही. 

कारण शेवटी स्वतःच्या वागण्यात ज्ञानेश्वरीचे तत्वज्ञान आचरण करणे एवढे सोपे नाही .

त्यासाठी स्वतःला प्रथम आत्ताच्या क्षणिक, भ्रामिक, जगापासून अलिप्त करून स्वतःलाच अलिप्तपणे पाहता आले पाहिजे. जोखता आले पाहिजे. स्वतःमध्ये बदल करता आले पाहिजेत, आणि हे बदल ,जेव्हा तुम्ही त्यातील एका ओवीचे जरी आचरण कराल, तेव्हा होऊ शकतात. 

 ज्ञानेश्वरीच्या अखेरीस त्यांनी पसायदान मागितले आहे. 

म्हणताना पसायदान म्हणजे "अंजुळीभर" मागणे. 

परंतु त्या "अंजुली" मध्ये सगळ्या विश्वाचे कल्याण सामावलेले आहे .आणि असे मागणे आतापर्यंत कोणीच, कुठेच, विश्वासाठी जगासाठी केलेले नाही

जैसा भ्रमर भेदिकोडे

 /भलतै से काष्ठ कोरडे

परी कळीके माझी सापडे

 कोवळीये(१-२०१)


या ओवी मध्ये वरवर असे दिसते की, एखादा भुंगा जो कठीणात कठीण लाकडाचा भुगा करू शकतो, परंतु तोच भुंगा जर कमळाच्या आत मध्ये किंवा एखाद्या कळीच्या आत मध्ये सापडला, तर तो गुदमरून आपला प्राण देतो, परंतु त्या कमल दलाला  धक्का लावत नाही. 

वरवर हे साध उदाहरण आहे .

पण प्रत्यक्ष जीवनात बऱ्याच वेळा, कर्तव्य कठोर असणारी माणसे, स्वतःच्या आप्तासमोर अतिशय नरमपणे वागतात, कारण तेथे प्रेमाचे बंध तोडता येत नाहीत. 

आपल्याच जवळच्या माणसांना दुखावता येत नाही. 

म्हणून कधी कधी जसा तो भुंगा श्वास गुदमरून मरतो, तसे ही माणसे आतल्या आत गुदमरत राहतात

पण आपल्या जवळच्या माणसांना दुखावत नाहीत. ही त्या प्रेमाची कोवळीक, ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवी मध्ये मांडली आहे.


Rate this content
Log in