Pallavi Udhoji

Others

1  

Pallavi Udhoji

Others

जनरेशन गॅप कालची व आजची

जनरेशन गॅप कालची व आजची

5 mins
376


       आज ठिकठिकाणी अस बोललं जातं की "आमच्या काळी असं नव्हतं" परंतु आजची ही पिढी ह्या वाक्याकडे कानाडोळा करते त्याचं कारणाने ह्या जनरेशन गॅप ची दरी होताना दिसत आहे. तस पहिला तर ह्या वाक्याचा उदय हा विसाव्या शतकात झालं आणि ह्या वाक्याला शीर्षक दिलं गेला "जनरेशन गॅप".

       काळानुसार ह्यात बदल होत गेला हा बदल प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे तो अंगिकारत होता, नव्हे तर तो नकळतपणे बदलत होताना दिसत आहे. ही एक समस्या होऊन बसली आहे. ही समस्या येवढे अक्राळविक्राळ रूप धारण करेल हे स्वप्नातही वाटले नव्हते. ह्याला फक्त हे तोरण लावले गेले की आजकालच्या पिढीला स्पेस हवी आहे एवढंच फक्त.

आता हा बदल कसा होत गेला बघा. स्वतंत्र घराची जागा ही फ्लॅट स्कीम ने घेतली. जेथे मैदानावर खेळ खेळले जात होते ती जागा टीवी, कॉम्प्युटर ने घेतली. चौकात चौकात कठड्यावर बसून युवा मंडळी गप्पा ठोकत होती ती जागा आज फेसबुकने घेतली. घराघरात होणाऱ्या सणावराची जागा क्लबने घेतली आणि आपापसातील नात्याची जागा डे नी घेतली. जॉइंट फॅमिली पद्धत बदलून विभक्त कुटुंब स्थिरस्थावर होईपर्यंत ती जागा छोटे कुटुंब पद्धती केव्हा आली हे कळलंच नाही. त्यामुळे आता असा वाटायला लागला की ओल्ड इज गोल्ड असे जे म्हणतात ते खरे की परिस्थितीनुसार बदला म्हणणारे खरे. एकत्र राहणारे सुःखदुख शेयर करणारे बरोबर की आई वडील ह्यांचापासून वेगळे राहून मदर्स डे, फादर डे साजरा करणारे मुलं बरोबर. काही समजायला मार्गच नाही. ह्याचे उत्तर शोधायचे तरी कुठे. ह्याचे उत्तर काय वृद्धाश्रमात शोधायचे? मुलांच्या सुखासाठी आयुष्यभर ओझे झेलून अनाथाश्रमात खितपत पडलेले आई वडिलांकडे? सांगा ह्याचे उत्तर कुठे शोधायचे. ह्या वास्तववादी उत्तर शोधून उपयोग काय. नुसती चर्चा करून रॅली काढून उपयोग नाही ह्याचाच पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडिया लगेच उभा ठाकतो. असा वाटल की ह्याच उत्तर तावातावाने मांडले जाईल, पण सगळं व्यर्थ. आज समाजात ज्या घटना घडणार आहे त्या घडतच राहणार.

हा एक असाध्य रोग आहे ज्यावर कोणताच असा उपाय नाही. पण हा रोग होऊच नाही म्हणून काही उपाय आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. कारण ह्या गोष्टी पुढे होणार. तसं पाहिलं तर टीवी, मोबाईल, सोशल मीडिया, व्हॉटसअप आणि हल्लीचा पब्जी, क्लब सारखे जीवघेणे राक्षस आणि नकळतपणे ह्या पिढीवर विळखा आवळायला सुरवात केली.

आज प्रत्येक पिढीने एकमेकांचा आदर करायला हवा. चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ह्या दोन्ही बाजूने आहे. त्याचा समन्वय राखणे गरजेचे ठरत आहे. मला असं म्हणायचं नाही की गेलेली संस्कृती ही परत येणार नाही पण ही जनरेशन गॅप ही नक्की भरून निघेल अस मला वाटतं.

आता जनरेशन गॅप ची एक बाजू मी मांडली पण नेहमी एकच बाजू खरी असते असं नाही नाण्याला दोन बाजू असतात हे तितकेच खरे आहे.

आज प्रत्येक गोष्टीत स्वतंत्र विचार करण्याच्या धावपळीत आजच्या संस्कृतीतील नैतिक मूल्ये ही ढासळत चालली आहे पण हा वाद, ही मूल्ये ह्यात कोण झुकेल हा प्रश्न उभा राहतो. जी गोष्ट आपल्याला साधी दिसते त्यात सुद्धा एकापेक्षा जास्त पैलू असतात. फरक केव्हा पडतो जेव्हा आपण तो प्रश्न कुठल्या चक्षुमधून बघतो तेव्हा.

आज तरुण पिढीमध्ये चर्चेला उधाण आणणारा प्रश्न म्हणजे मोबाईल. आजची तरुण पिढी ही ह्या मोबाईल युगात आकंठ बुडलेली दिसते. तसेच इंटरनेट सुद्धा. माझं अस म्हणणं आहे की आजची तरुण पिढी इंटरनेटवर दाखवल्या जाणाऱ्या बिभित्स गोष्टी आतुरतेने बघताना दिसते आहे. पण जेव्हा आपण चाळीस ते साठ ह्या वयोगटातील मंडळीनी ह्याच वयोगटातील पालकांवर दृष्टी टाकली तर एक वेगळ सत्य समोर येत त्यानंतर असा प्रश्न पडतो की ह्या पिढीमध्ये कोण बरोबर आणि कोण चूक.

घरातल्या वडिलांनी आपल्या पाल्यासाठी केलेला त्याग तुम्ही बघितला आहे. स्वतः फाटका राहणार आणि आपल्या मुलाला ब्रँडेड कपडे घेऊन देणार. स्वतः साधा मोबाईल घेणार पण मुलाला अँड्रॉइड फोन घेऊन देणार. पण आज जी वस्तुस्थिती आहे ती वेगळी दिसून पडते आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी विकसित होत आहे त्याचबरोबर मार्केटमध्ये स्पर्धा वाढीस लागली आहे आणि मोबाईल सारख्या वस्तूची किंमत माफक दरात उपलब्ध आहे त्यामुळे आजकालच्या सगळ्या पालकांकडे अँड्रॉइड फोन दिसत आहे.

आपली मानसिकता कशी आहे बघा, आज जर अँड्रॉइड फोन एका तरुण मुलाच्या हातात दिसला की माणसाची विचार करण्याची मानसिकता अशी होते की हा सगळे वाईट काम मोबाईल वरच करत आहे. आज जेवढं मोबाईलचा वेड तरुण पिढीला आहे तेवढंच वेड आज चाळीस ते साठ वयोगटातील लोकांमध्ये दिसून पडत आहे. त्यांची जास्त ओढ इंटरनेटवर दिसणाऱ्या चित्रफिती कडे जाताना दिसत आहे. माझं असं म्हणण नाही की सगळेच वयोवृध्द चुकीचे किवा सगळे तरुण चुकीचे आहे. तरुण पिढी ही चुकीची आहे हा टप्पा मात्र चुकीचा ठरू शकतो.

नैतिक मूल्यांचा विचार करता तर ह्या बाबीवर दुर्लक्ष करून चालणार नाही. सद्या वृद्धाश्रमात जी वृध्द मंडळी आहेत ती आजची जी तरुण पिढी आहे त्यांचे पालक नाही तर ह्याचा पालकांचे आई वडील आहेत.

सगळा दोष तरुण पिढीला नको द्यायला कारण आजची तरुण पिढी ही प्रॅक्टिकल दृष्टीने विचार करते. आज आपण पाहतो की लहान मुलं घरात त्यांचा आजी आजोबांना आबा, आजी अशी हाक मारतात. पण दुःखाची गोष्ट अशी की ह्याच मुलांचे पालक त्यांचा आईवडिलांना म्हातारे, थेरडे अशी हाक मारतात. खरंच हीच तुमची नैतिक मूल्ये आहेत का?

आज घरात मतभेद होतात हे सत्य नाकारता येत नाही ह्याला कारण त्यांचा सभोवतालचे वातावरण. त्या त्या परिस्थितीत मागणी म्हणा किंवा ती गरज. ह्यात काळानुसार बदलणार. जो वाद आजच्या तरुण पिढीमध्ये किंवा पालकांमध्ये आहे तो कमी अधिक प्रमाणात आढळून येतो. आज ज्या चुका चाळीस ते साठ वयोगटातील लोकांनी केल्या नाहीत असं नाही म्हणून जे वास्तवात दिसते त्यावर निष्कर्ष काढून मोकळं होण्यापेक्षा व्यक्त होणं केव्हाही चांगलं.

मी वर म्हंटल्याप्रमाणे आजची ही तरुण पिढी प्रॅक्टिकल आहे ह्याचाच हे उदाहरण आहे. प्रत्येकाच्या गरजा असतात काही व्यावसायिक तर काही स्वतपूर्तच मर्यादित असतात.फक्त त्या समजुन घेता यायला हव्या.आणि ह्या गोष्टी ही आजची युवा पिढी करत आहे ह्याचाच अर्थ जनरेशन गॅप हे जे शीर्षक दिल्या गेलं आहे हा प्रश्नच उरणारच नाही.

एखाद्या कुटुंबातला वातावरण कसं असावं हे ठरवणारा घरातला एखादा कर्ता मोठा पुरुष असावा. म्हणजे एखादी गोष्ट करण्याची मोकळीक असली तर त्या घरात त्या व्यक्तीला खोटं बोलण्याची गरज भासत नाही. आज मुलगा किवा मुलगी हा भेद अजूनही कित्येक चुकाच मूळ आहे ही गोष्ट आज जर पालक वर्गाला समजेल तेव्हाच त्या घरातील मुलगी घरातच आपला स्वतंत्र विचार शोधेल. ती मुलगी म्हणा किंवा मुलगा आपल्या मनातील गोष्टी मित्रांजवळ शेयर न करता आपल्या आई वडिलांजवळ शेयर करेल

आजच्या ह्या बदलत्या काळात सगळ्यात असाध्य रोग म्हणजे " लोक काय म्हणतील". घरात आईवडिलांना दुःखी करून तो आपल्या सखिजवल सुखी राहू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या पिल्लांना दुःखी करून ते सुखी राहू शकतील का? "लोक" नावाचा रोग जो आहे तो तुमच्या कुटुंबाला विभक्त करू शकतो.तुमच्या कुटुंबाला नासाऊ शकतो. अशावेळी तुमच्या कुटुंबातील प्रेमाची विण तुम्ही तुमच्या आनंदाच्या सुयांनी घट्ट विणायला हवी. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती ठेवा. कारण इतर लोक जे बोलतात त्यांचा बोलण्यावर त्यांचा ताबा नसतो. आपल्या व्यक्तीला आपल्या प्रेमाचा ओलावा द्या. तो देणं आपल्याच हातात आहे आणि हे जर करता आल तर ही जनरेशन गॅप नावाचा शिक्का हा बसणार नाही असं मला वाटतं.


Rate this content
Log in