Meenakshi Kilawat

Others

1  

Meenakshi Kilawat

Others

जन्म माझ्या लेखणीचा"

जन्म माझ्या लेखणीचा"

3 mins
454


जन्म माझ्या लेखणीचा मला साथ मिळाला....

   मी व माझी लेखणी, रात्रंदिन सोबत असतोय. तीने मला जगण्याचा अमुल्य असा मार्ग दाखविला. मी जीवंत असे पर्यंत पुर्ण साहित्याची व खास कवितेची मनापासून ऋणी राहिल. ब्रम्हांडात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लेखणीचे साम्राज्य असत. मानवाच्या अवती भवती फिरून वेध घेणारी बोध देणारी तिच खरी लेखणी असते.लहान असतांनाच आईबाबांनी हाती लेखणी दिली होती.पण दहाविला गेल्यानंतर म्हणाले!आता बस शिक्षण ! पुरे झालय मुलीच्या जातिला काय करायच शिक्षण शिकून ,पण मला शिकण्याची खुप हाऊस होती.हुशार विद्यार्थीमधे गणना व्हायची.


        तिथे हिंदू भाषी जुन्या विचारांची लोक होती,पाचवी किंवा खुप झाले तर सातवीपर्यंत शिकवायचे,पण माझ्या आईबाबांनी मला दहावीपर्यंत काहिच बोलेले नाही.तशे बाबा तहसिलदार असल्यामुळे प्रगत विचाराचे होते ,आणि आईपण छान समजदार होती.पण गावातील काही आजोबा आजी त्यांना टोकायचे ,म्हणायचे झाल असेल ना शिक्षण, लग्न ( ब्याहाव ) करून मोकळे व्हा .पण माझा मोठ्या भावाने मला शिकवायचा मार्ग मोकळा करून दिला.त्यांनी विरोध केला म्हणुन मला शिकता आले.ग्रजूएशऩ पुर्ण करून लगेच लग्न करून सासरी आले, तर तिथे ही जुन्या पद्धतेची लोक होती.


      पण मी कधीच या लेखणीला सोडले नाही. लेखणीचा अन माझा साथ जन्मभऱ्यासाठीच करारबद्ध केला होता. लेखणी माझी सर्वस्व होती. सारख तिला हाती ठेवत असे ,पण आधी शिक्षण घेण्यासाठी लेखणीचा भरपूर फायदा उचलला. शिक्षण पुर्ण झाल्यावरही माझे स्वप्न संसाराच्या बेडीत अडकले होते. लेखणी सतत हाती रहायची.कधी सामानाची लिस्ट बनवायची कधी किराण्याचा हिशोब करायचा कधी रेसिपी लिहायची, बहिन भावाला पत्र आईबाबाला पत्र पतीला पत्र लिहायची.किंवा वेळ मिळाल्यास कविता चारोळ्या उखाणे लिहायचे. पेन्टिंग ,ड्रॉईग,कलाकृती, रांगोळ्या या सर्व हाऊस मोठ्या आनंदाने मी करायची. 


        काळानुसार कमीजास्त लिहायच काम पडतच गेले.वाचनाची ही तेवढिच आवड होती. मग काय तर घरीच छान छान व्यजंन बनवायचे व सर्व कुटूंबियाना,मित्र परीवाराना खाउ घालायचे व आनंद भोगायचा. पण शिकल्यानंतर रांधा,वाढा करायला जरा जडच जातय.पण नाईलाजास्तव लेखणीला मागे सारून कुटुंबियाना सावरण्यात वर्ष गेले ,साऱ्यांना माझी आवडीची चाहूल लागली. आणि खरी लेखणीची गाठभेट अश्याच परिस्थितीत झाली.माझ्या पतीने मला खुप प्रोस्साहन दिले ,माझ्या प्रत्येक कलेच भरभरून कौतूक केलय. आधी कधीतरी मी एक कविता लिहिली होती, मला आठवतो तो दिवस ,घरी कश्याचा तरी उत्सव होता.त्या दिवशी माझी कविता,सर्वांना स्वता: त्यांनी वाचून दाखविली होती. मी लाजेने गोंधळले होते. पण त्या दिवशी साऱ्यांनी माझ भरपूर कौतुकही केलेल होत. झाल गेल मी संसाराच्या व्यापात विसरले होते.नतंर मला पतीने संस्था रजिस्टर्ड करून्यात मदत केली. शासण मान्यता प्राप्त इंन्टिट्यूट ,महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र,व तांत्रिक विद्यालयास खुपच मदत केली. 


     अतिशय गरीब,निराधार मुली व महिला माझ्या  संपर्कात आल्या.दररोज एक ना दोन नविन दैन्यकथा त्याच्या डोळ्यात मला दिसायची.माझ्या जीवनात मी सर्व सुखच बघितले होते त्यामुळे मला गरीबीची किंवा दुखाची जान नव्हती असे म्हटंले तरी चालेल ,कधीच असल्या दिनहिन परिस्थितीशी माझा सामना झाला नव्हता. अश्या गोष्टींवर माझा विश्वासच बसेना.पण त्या दुखी,कष्टी स्त्रीयांचे हाल पाहून, माझ्या डोळ्यातून अश्रृ वाहायचे मन ढवळून यायच,मनात सारखा ध्यास असायचा ,या क्षेत्रातील स्त्रीयांसाठी काहीतरी करायचे ,आणि मी करून दाखविले,त्यांना आपल्यी पायावर उभे केले,त्याना संक्षम केले ,त्या आताशी सर्व सुखी उद्योजिका झाल्या आहे.व होते आहे. मला त्या स्त्रीयां व मुलीकडून संवेदना मिळाल्या ,त्या संवेदना मी माझ्या लेखणीत भरतेय. ज्वलंत उदाहरण माझ्या नजरेसमोरच असतात. म्हणुनच मी साहित्यातही थोडीशी लेखणी चालवत असते.तसा वेळ नसतो पण आवड ही कुणाच्या बंधणात नसते.ती वेळ काढूनच घेते. 


विश्वातल्या अनेक संताची शिकवण मनी ठेवून वेळ मिळाल्यास वाचण करत असते. आपल्या या अल्प बुद्धीला चालना देते. घडण्याच्या नादात मी पण घडतच गेले. माझ्या मन्तव्यानुसार प्रयत्नांती परमेश्वर मिळतोय. म्हणजेच आत्मानंद मिळतो.


Rate this content
Log in