Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

जीवननौका

जीवननौका

2 mins
143


  *आपण सारे जीवन नौकेत सवार झालेले आहोत. हा जीवनप्रवास सर्वांसमवेत नऊरसांद्वारे आनंद,दुःख याचा ताळमेळ साधत जीवन सुखाचे करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत.*

    *ही जीवनरूपी नौका दुःख, आनंद, नम्रता, क्रोध, हर्ष, मद, मत्सर अशा अनेक रसास्वादावर हिंदोळे घेत आयुष्याचा स्वाद चाखत आहे.*

   *आनंद ही जीवनात आलेली नव पालवी आहे ही जीवन छान जगण्याची प्रेरणा देते आनंदाचे अत्तर जीवनबाग फुलवते.हे अत्तर स्वतः लावावे.इतरांना लावायला द्यावे*

   *आनंद या जीवनाचा*

    *सुगंधापरी दरवळावा*

     *पाव्यातला सूर जैसा*

    *ओठातुनी ओघळावा*

  *दुःखाचे सावट आले तर त्याच्याशी चार हात करावेत.दुःखाला सामोरे जावे.डगमगून न जाता त्यातून मार्ग काढावेत*

   *दुःख दिले मला देवाने*

   *परी सहनशक्ती ही दिली*

   *मला ही ताकद देवाने बहाल केली*

    *असे म्हणून दुःखाला बाय करत ते ही क्षण जातील या भावनांची जागृती करावी.म्हणजे त्रास होत नाही,*

    *नम्रता हा गुण कायम अंगी बाणवावा.कारण या नम्रतेमुळे समाजात एक वेगळी प्रतिष्ठा मिळते.वादविवाद कमी होतात.नम्रपणामुळे समोरचा जरी तावातावाने बोलत असेल तर तो देखील नम्रतेने संवाद साधण्याचा प्रयत्न करतो.*

   *क्रोध नकोच.क्रोधाने कोणाचे भले झाले हो? क्रोध म्हणजेच राग. आपला राग आपल्या काबूत ठेवता आला पाहिजे. रागावर नियंत्रण करता आले तर वादाचे कारणच उरणार नाही.जे सांगायचे आहे ते नम्र भाषेत सांगावे.*

   *हर्ष म्हणजेच अतीआनंद.जीवनरूपी या सागरात अनेक हर्षाचे क्षण येतात.ते ह्रदयाच्या आतील कुपीत साठवून ठेवावेत.दुःखाचे सावट आले की हे क्षण स्वप्नवत पुन्हा जगावेत.जगून पाहा...या क्षणांना खूप हर्ष होतो.*

   *मद म्हणजे प्रेमभावना जी पुरुष स्त्रियांच्या मनातील एकमेकांबद्दलची ओढ.हे क्षण देखील अतीव सुखाचे असतात.यात एकमेकांबद्दलचा आदर प्रेम रुसवा समाविष्ट असतो.आणि तो हक्काचा असतो.*

   *मत्सर म्हणजे एखाद्या व्यक्तीबरोबर वाटणारी तिडीक.पण हा मत्सर मनी अजीबात बाळगू नये.मनी बाळगला तर द्वेश वाढत जातात.नजरेसमोरही ती व्यक्ती नको वाटते.मग माणूस अगदी वाईट वळणाला लागण्याची शक्यता असतो.प्रसंगी मारामारी करायला हे लोक तयार असतात.तर हे मानवा कोणाबद्दलही मत्सर, द्वेष मनात न बाळगता सर्वांशी सौख्याने वागण्याचा प्रयत्न कर.*

   *जीवनाचे दान दिले देवाने*

   *आनंदाने आपण पदरी घेवू या*

   *आनंदाचा रंग उधळू या जनात*

   *हर्षाचे क्षण मनामनात भरू या*


Rate this content
Log in