"जीवनात नावच महत्वाचे हो"
"जीवनात नावच महत्वाचे हो"
"नावात काय ठेवलंय हो, अशे आपण म्हणतो तर ह्या प्रसंगी एक कथा सामोरी ठेवते.स्मिता ला सासरचे बघायला आले, तिने स्पष्ट सांगितले होते, बाबा रिटायर्ड झाल्यानंतर आई-बाबा ह्याच घरात राहतात आणि मी लोन घेऊन घर बनविले म्हणूनच माझ्या नावावर आहे हो. तेव्हां सासुबाई म्हणे "नावात काय ठेवलयं हो" आम्हाला काही हरकत नाही, तू तर आई-बाबांना हा आधार देऊन पुण्याईच केली.
नंतर मग लग्नझाल्यावर लक्ष्मीपूजनेच्या वेळेस सासुबाई म्हणायला सुनेचे तर आम्ही नवीन नाव ठेवणार, तेव्हां आई म्हणाली आहो विहीणबाई आम्ही पोटाचा गोळा तुम्हाला देत आहोत, अता नवीन संसारात तिने पाऊल टाकले तर ती तुम्हालापण आधारच देणार हो. ज्या नावा व संस्कारामुळे आज आम्हाला आधार मिळाले, तर आम्ही दिलेले जन्माचे नावाचे अस्तित्व राहु द्यावे हो, "जीवनात नावच महत्वाचे हो".