STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

जीवनाची दुर्दशा करणारी नशा

जीवनाची दुर्दशा करणारी नशा

2 mins
1.1K


हा विषय तसा काही लिहिण्यासारखं नाहीये. त्या दिवशी मी माझ्या एका वाचकांकडे गेली ती म्हणाली की अग पल्लवी काहीतरी ह्या विषयावर लिही. माझ्याकडे काम करणारी बाई रोज बिचारी माझ्याजवळ रडते तिचा नवरा रोज दारू पिऊन येतो आणि तिला मारहाण करतो. दारूमुळे किती घर बर्बाद होतील माहित नाही. तू असं काही लिही की समाजात राहणाऱ्या व्यसनाधीन पुरुषांचे डोळे उघडायला हवे.

     व्यसन हे मुळात वाईट असत. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्या शरीरावर एखादा फोड झाला त्यावर जर आपण उपचार केला तर तो बरा होईल परंतु उपचारच केला नाही तर तो पसरायला वेळ लागत नाही आणि हे व्यसन तुमच्या मृत्यूला आमंत्रण देत. मला असं वाटतं की हे व्यसन हे नेहमी घातकच असत . नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे जगात दोन गोष्टी आढळून येतात. एक सकारात्मक व दुसरी नकारात्मक. आता जी गोष्ट आपल्याला योग्य वाटते त्या गोष्टीचा ध्यास आपल्या मनाने घ्यायला हवा.

    समाजात ज्या व्यक्तींना व्यसन लागतं समाज त्याच्याकडे नेहमी वाईट नजरेने पाहतो व्यसनाला बळी पडणारी गोष्ट म्हणजे त्यांची संगत. आता संगत म्हणजे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती ह्याची संगत तो कोणत्या संगतीत असतो त्यावरून त्याच्या मनाची, त्याच्या स्वभावाची, तसेच त्याच्या व्यक्तिमत्वाची व्यासंगता अवलंबून असते. जर समोरच्या व्यक्तीने त्याला व्यसनाकडे ओढण्य

ाचा प्रयत्न केला तर हे संपूर्ण त्याच्या मनावर अवलंबून असत कारण वाईट गोष्टींचा प्रभाव सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या मनावर आधी अटॅक करतो व तो नकळतपणे होतोच होतो पण कोणतीही गोष्ट करताना ती करावी की करू नये सर्वप्रथम हे त्या व्यक्तीचे मन ठरवतो कारण मन हे सकारात्मक व नकारात्मक या दोन गोष्टी ठरवतो आणि जी गोष्ट योग्य वाटते तेच मन त्याचा कास धरतो. अर्थात दारू, तंबाखू, सिगरेट वगैरे.

  आता एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मित्रांसोबत बारमध्ये बसल्यावर ती व्यक्ती तुम्हाला तुमचं नाक दाबून दारू तुमच्या घशात ओतनार नाही. तुमच्या समोर दारूचा ग्लास ठेवेल घ्यायच की नाही हे तुमच मन ठरवेल. आपला जर मन ताब्यात असेल तर तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवू शकाल तुमच मन जर ताब्यात नसेल तर तुम्ही त्या गोष्टीकडे आपोआप ओढले जाल. मला असं वाटतं जेव्हा तुम्ही दारू प्यायला जाल फक्त एकच गोष्ट करा आपल्या केविलवाण्या लेकराचा आणि गरीब पत्नीचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि विचार करा की मी जर ह्याच्या आहारी गेलोआणि माझं बरं वाईट झालं तर माझ्या मागे माझ्या पत्नीचे आणि मुलाचे काय हाल होईल ते कोणाकडे बघतील फक्त हा विचार तुम्ही करा हळूहळू तुम्ही या व्यसनापासून दूर व्हाल. हा प्रयत्न तुम्ही एकदा करून बघा आणि हे शस्त्र ज्याने अवलंबले तो ह्या वाईट गोष्टीपासून आपोआप दूर होईल आणि योग्य वेळी प्रहार करून मात करू शकेल असं मला वाटतं.


Rate this content
Log in