जीवनाचा खरा आधार
जीवनाचा खरा आधार


बघा ना, हा फोटो च खूप काही आपल्याला सांगून जाणारा आहे, नाही का????
वृद्धावस्था, खरं तर ह्या अवस्थेतून सगळ्यांनाच कधी ना कधी जावे लागते. तसं बघितलं तर, जीवनाच्या तीन अवस्था असतात,
१) बाल्यावस्था २) तारुण्यावस्था ३) वृद्धावस्था.
बाल्यावस्था - आपल्या जीवनाची खरी सुरुवात ह्या बाल्यावस्थेपासून होते, आपण ह्या जीवनात येतो, ही अवस्था म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर नटखट कान्हा सारखी. अगदी मस्तीखोर, टिंगल-टवाळ्या करणे, बसं ह्यातच जाते.
मग येते, तारुण्यावस्था - हा टप्पा जीवनातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो, ह्यात अंगावर जबाबदाऱ्या असतात, खूप काही करायचं असतं, ध्येय पूर्ण करायचे असतात, पैश्यांची जमापुंजी करून ठेवावी लागते जेणेकरून वृद्धापकाळी गरज पडेल.
आणि शेवटी येतो वृद्धापकाळ म्हणजेच आपल्या जीवनाची अंतिम अवस्था....,
वृद्धावस्था - ही अवस्था जर आपण पाहिली, तर बाल्यावस्था सारखीच असते. मधल्या टप्प्यात एवढं काही केलेलं असतं, की आता अक्षरशः शरीर थकून जाते, साथ देत नाही. पण ह्या वेळेस खरी गरज असते ती म्हणजे आपल्या माणसांची.
एक साथ हवी असते, सहानुभूती हवी असते, पोराबाळाचं प्रेम हवं असतं, नातवंडांचं सुख हवं असतं. ह्या सगळ्या पलिकडे ह्या थकलेल्या शरीराला आरामाची गरज असते.
या तिन्ही अवस्थेतून आपल्या सगळ्यांनाच जायचं आहे, त्यामुळे कोणाकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही, आज घरात आपले आई वडील वृध्द असतील, उद्या तीच वेळ आपल्यावर ही येणार, म्हणून जर आपण त्यांची योग्य ती काळजी घेतली तर च आपली ही काळजी घेणारं कोणी तरी असेल....,
काठीचं जर आपण बघितली, तर सगळ्यात मोठा आधार ह्या वृद्धावस्थेत काठीचा असतो, एकदा हातात घेतली की कधीच स्वतःहून साथ सोडणार नाही, काठीचा आधार तेव्हाच लागतो, जेव्हा माणसाचा आधार सुटतो, नाही का???
थोडक्यात काठीचा ही आधार असू द्या, पण माणसाचा आधार सुटता कामा नये, कारण आपल्याला माणसातली माणुसकी जिवंत ठेवायची आहे, ती मरता कामा नये.... आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, ते म्हणतात ना स्वर्ग सुख अनुभवायचं असेल, तर तर त्याचा खरा आनंद हा आपल्या आई वडिलांची सेवा केल्याने मिळतो... अगदी खरंय!!!!