Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

जीवन एक रंगभूमी आहे"

जीवन एक रंगभूमी आहे"

3 mins
2.7K



   जीवन एक रंगमंच आहे.खरच रंगमंचाची अजब तऱ्हा असते. रंगमंच हा सौदागर आहे. माणसाला खुप खोलवर लोभात पाडत असतो. बालपणात आपण अनेक स्वप्न बघतोय. जरा मोठे होताना आपणास वाटते, मी मोठा होईन,खुप शिकीन,नौकरी करीन,विवाह करीन, मुल होईल, मुल मोठे झाल्यावर त्याना शिकवीन सुनबाई आनीन नातू खेळवीन कशी व कितीतरी स्वप्न बघून या जीवन रंगमंचाला भाळत असतो.मोठमोठे कार्य करीत असता त्यात पुर्णतया समरस होतोय. आज मानव मंगल ग्रहावर जीवन शोधत आहेत.पंरतू हा शोध नाही घेत की आपल्या जीवनात मंगल किती आहे.

     जीवन एक रंगमंच आहे.इथे कितीतरी अभिनय आयुष्यात करावे लागत असते.जीवन एक रहस्यमयी रंगमंच आहे.इथे दैनंदिनी दिवस उगवताच अभिनयाला सुरवात होते जेंव्हा झोप लागते तेव्हाच संपते.प्रत्येक व्यक्ती हा जीवन जगत असतांना.आपल्या जीवनाच्या रंगमंचाचा नट असतो.आपल्या जीवनप्रवासात सहप्रवासी खूप मोठी भुमिका निभावत असतात,त्यांचे पडसाद आपल्या मनावर खोल उतरतेय व संघर्षमय जीवनात ध्येयवादासाठी आपल्या स्वप्नांसाठी झटतांना अनेक वेळा रंगमंच साकार करावा लागत असतो.आपली माया कधी अभिनय करायला लावत असते.आणि कधी गुन्हेगारप्रवृत्ती अभिनय करायला लावते. कधी समाजात वागतांना अभिनय करायला लावते.अनेक व्यक्ती तितक्या क्लूप्त्या असतात. आपापल्या संसारात प्रत्येक व्यक्ती रंगमंचाचा बादशहा परीपरीने रंगमंचावर वावरत असतो.

      नौकरीत आपल्या बाॅसची मर्जी सांभाळणे. घरी पत्नीची, आईबाबाची, भाऊबहिनीला आपल्या अभिनयाने खरेखोटे बोलून निरागसपणे रंगमंच साकार करणे.आप्त स्वकीयांचीही मनस्थिती ओळखून किंवा बाहेर मित्र मंडळीची,प्रतिष्ठीत लोकांशी कसे बोलायचे कसे वागायचे ही कसरत करीत असता वेळोवळी अभिनय करित असतोय.आपली मुले जेंव्हा शिकायला किंवा नौकरीला बाहेर असतात.आणि ती घरच्या लोकांच्या तब्बेतीची काळजी करतात.तेंव्हा आपण नाईलाजास्तव भोळा भाव दाखवून हसून त्यांची काळजी दूर करत असतोय. हा ही रंगमंचाचाच भाग असतोय.   

       जीवनात जगत असता अनेक जवाबदाऱ्या असतात. कुणालाच वेळ नसतो .त्यात रूसने फुगने ही असते. एकत्र कुटुंब पद्धतीत आग्रह दुराग्रह या गोष्टींना समोर जायला रंगमंच गाजवावा लागत असतो.

       या अनमोल जीवन रंगमंचावरील आपण सारे कलाकार आहोत. आपण कसे जगले पाहिजे.तो अधिकार निसर्गताच आपण सर्वांना मिळाला आहे. आपापसातील सारे भेदभाव, रागलोभ,मद मत्सर विसरून "एक सुंदर वलय आपल्या भोवती निर्माण" करून आपल्या जीवनाला योग्य वातावरण देवू शकतोय. आणि सुदृढ आत्मविश्वासाने जगण्याचा शंंभर टक्के अट्टाहास करू शकतोय.आणि आपले जीवन सार्थकी लावू शकतोय. मानव जन्म पुन्हा भेटणारा नाही.एवढे लक्षात ठेवणे अती आवश्यक आहे.म्हणून या अद्वितीय सुरेख मंचावर मनाचे राज्य हसत केले पाहिजे.आपण पृथ्विवर भार होऊ नये.जीवनाशी नाउम्मेद किंवा उदास होऊ नये. प्रयत्नांती परमेश्वर देखिल मिळतो.आपल लक्ष्य नजरेसमोर ठेवून नित्य कर्म करत राहायला पाहिजे.आपण निसर्गाकडून शिकवण घेऊ शकतोय. जसा सूर्य नियमित उगवितो.रात्र अन दिवस नचूकता होत असते.आकाशात असख्य सितारे उगवतात 

मानवच काय प्राणीसुद्धा नियमात रहातात. 

पावसाळ्यात ढगांचा गडगडाट होतोय,विजेचा लखलखाट होतोय,पक्ष्यांचा किलबीलाट होतोय, तसाच जीवनात सुखदुःखाचा बोलबाला असतोय.नघाबरता या जीवन रंगमंचावर आपला ठसा निर्माण करण्यासाठी सारखे झटत रहावे व आनंदाने जीवनाच्या रंगमंचावर धाडसाने जगायचे.

     " शेक्सपिअरनं म्हटल्याप्रमाणे जीवन ही एक रंगभूमी आहे"..."अनेक मान्यवर साहित्यिकानी ही"जीवन रंगमंच आहे हेच म्हंटलेले आहे". प्रत्येक मानवाची प्रत्येक सजीवाची एक जिवन गाथा असते. कधी ती यशाच्या उंच शिखरावर घेणारी असते तर कधी अपयशाच्या खाईत खोल जाणारी असते. कधी ती इतरांसाठी वाहून घेतलेली असते तर कधी स्वार्थासाठी न्हावून निघालेली असते.नाटक करता करता आयुष्य निघून जातय.आणि कोणतेही कार्य संपुर्ण झालेले नाही.अजून थोडा काळ पाहिजे होता. आणि आपण या विशाल दुनियेच्या रंगमंचावरती आपले जगणे विसरतोय फक्त नजरेसमोर कर्तव्य व ध्येयाचा प्रेक्षक उभा असतो.पडदा पडतो आणि या दुनियेच्या रंगीत तालमिच्या विशाल रंगमंचावर आपण आपला शेवटचा श्वास सोडतोय.


Rate this content
Log in