krishnakant khare

Others

4.3  

krishnakant khare

Others

जीवन एक रंगभुमी

जीवन एक रंगभुमी

3 mins
702



जीवन काय असतं जिथे आपण जगत असतो तेथे आपलं जीवन असतं. आपण जगत असताना जीवनात अशा काही गोष्टी घडत असतात की जीवन एक रंगभूमी आहे आणि आपण त्या रंगभूमीवरचे कटपुतली आहोत असं वाटायला लागतं.

जगामध्ये जी काही जीवसृष्टी निर्माण झाले त्या सर्व जीवसृष्टीला आपापलं जीवन आहे, आणखीनच म्हणायचं झालं तर आपण काय म्हणतो तर जीवन संसार,आयुष्य. जीवन कधी कधी संसार असतो तर जीवन कधी आयुष्य असतं म्हणून तर कवीकारांना जीवनावरील कविता रचताना संसार या शब्दाचा पण उल्लेख आढळतो, "शापित "या मराठी चित्रपटात रंजनाजी आणि यशवंतजी दत्त त्यांच्यावर एका गाण्याच्या दृश्यात हे गाणे म्हणजे "तुझ्या माझ्या संसाराला आणिकाय हवं" म्हणजे तुझ्या माझ्या आयुष्याला आणि काय हवं किंवा तुझ्या माझ्या जीवनाला आणि काय हवं असं कवी कविता रचताना समानार्थाच्या शब्दांचा तो उपयोग करतो, म्हणजेच जीवन या शब्दाला कितीतरी अर्थ दडलेले आहेत, कधी कधी तर नायक नायिकेला आपल्या संसारातील गाणं म्हणून दाखवतो ते म्हणजे गाणे "सहजीवनातील आली ही स्वप्न सुंदरी तीची माझी ,तीची माझी आहे बरोबरी..... म्हणण्याचा तात्पर्य हा, "जीवसृष्टिला ,"जीवन" हि अशी मिळाली भेट आहे की जिचा वापर व्यवस्थितरीत्या झालं तरच ते महत्वाचे होईल, आपण छोट्या मोठ्या गोष्टीने अपसेट ना राहता आपण कोणाच्या मदतीला येणाच काम आपल्याकडून व्यवस्थितरित्या पार पडतोय ना हे असं.जरी वाटल तरी समजायचेय कि आपलं आयुष्य,आपलं जीवन सत्कारारिणी लागलं 

एक साधं उदाहरण द्यायचं पाहिलं तर नवर्याचं बायकोबरोबर काही कारणाने क्षुल्लक भांडण झाले आणि दोघांचा अंहकार पुढे आला तरी संसाराची वाट लागली असं म्हणता येईल पण दोघांना

 जीवन हि रंगभूमी आहे आणि आपण त्याचे ईशार्यावर चालण्यारे कटपुतळे आहोत ह्याचे जरी रहस्य समजले तर तुम्हाला असंच आढळेल कि लग्नाआधी आवडणारी बायको किंवा नवरा , भांडण झालं म्हणून आवडेनाशी होते मग आपण परस्री मध्ये किंवा परपुरुषामध्ये आवडनारी 

व्यक्ती शोधतो व आपण तिचे कौतुक करायला जातो व इथेच आपलं पाय घसरू शकतं ,आपला असलेला सुखी संसार मोडु शकतो पण आपण आपल्या या गोष्टी बद्दल वेळीच सावध होऊन परव्यक्तीला दोन कौतुकाचे शब्द बोलणार होतो तेच प्रेमाचे,कौतुकाचे दोन शब्द आपल्या बायको समोर बायको साठी किंवा नवर्यासमोर नवर्यासाठी आपला अहंकार सोडुन  बोललो तर 

, मग बघा परत कशी आपल्या सुखीसंसाराची गाडी रुळावर येते ती.हिच तर आपल्या जीवनाची रंगभुमी असते ज्याला ह्या जीवनाच्या रंगभुमीची सुत्रे कळली तो निहाल झाला तो सुखी संसाराच्या मार्गाला लागला.हेच तर जीवनाच सार आहे,कस आहे त्यासाठी आपल्याला जीवन दोन क्षणांचाही सुद्धा नाही ह्याचे रहस्य कळले ना मग आपण बरोबर जगायला शिकतो आपण जगतो दुसर्याला जगायला मदत करतो त्यात आपल्याला आनंदही मिळतो इथेच आपल्या जीवनातला आत्मा आपल्याला सहजपणे आनंद देऊन सुचवत असतो,तुझ्या जीवनाची गाडी व्यवस्थित रित्या चालली आहे म्हणून,जीवन हि रंगभुमी आहे म्हणुन जगण्याचा प्रयत्न करावा आपलं हे पात्र,भुमिका साधं,सरळ जगण्याचा जाणीवेने प्रयत्न करावा,त्यातच मिसळून जायचेय.हिच तर जीवनाची रंगभुमी जीचा वापर जीवनातल्या कलाकाराला,

माणसाला आत्मगौरवाकडे नेणारा असतो.माणसाला निसर्गातच कोणत्याही बाबतीत विचार करण्याची कुवत दिलेली असते,म्हणून तर

म्हटलं आहे,"मन चंगा तर कटोती में गंगा "

रंगभूमीवर पात्रे, कलाकार आपली कथेनुसार भुमिका वठवताना आपल्यातला मी बाजुला ठेवुन कथेतला कलाकार ऊभा करतात व समाजाला त्या पात्राकरवी चांगलं समाज प्रबोधन कसं होईल हे पाहतात

."एकास ठेच दुसरा शहाणा"या उक्तीप्रमाणे 

 हेच माध्यम असते,आपण त्या कलाकाराचे पिक्चर बघुन तो  कशामुळे तोंडघशी पडला म्हणुन आपण तोंडघशी नको पडायला  म्हणून चांगल्या मार्गाला वळणारे प्रेक्षक आहेत. कलाकाराचं ,कलाकारपण हेच त्याच्या कथेतला कलाकाराला कोणकोणत्या संकटाला,दु:खाला सामोरे जाऊन त्यातून सहीसलामत मार्ग काढतो म्हणजेच

 तो कलाकार समाजातल्या अशाच व्यक्तीचं प्रतिक असतो,म्हणुन समाजातल्या वाईट गोष्टीला थारा न देता चांगल्या मार्गाने मार्गाला लागलं पाहिजे,

जगातल्या विविध प्रांतातल्या समाजात वेगवेगळ्या तऱ्हेचे स्वभावाचे माणसे असतात त्यानुसार त्यांचा व्यवहार असतो आणि "एवरी पर्सन एवरी तेंडेन्सी"हाच काय तो काय प्रकार असतो. म्हणून वर्तमान पेपर यात आपण कुठे वाईट कुठे चांगल्या बातम्या वाचत असतो हेच आपण रंगभूमी वर नाटकाद्वारे नाटकातला कथा प्रकार यातील पात्र त्यांचे काम त्यांची ती कामे बघून आपण आपल्या खऱ्या जीवनात सावध होऊन आपला रोजचा कारभार ते तरी व्यवस्थितरित्या पार पाडत असतो जीवनातल्या अशा कितीतरी गोष्टी म्हणजेच आपण आपला जीवनातला जीवनपट अनुभवत असतो म्हणून तर म्हटलंच

खरंच जीवन एक रंगभूमी असे विचार करताना आपल्या संसारातील समाजाला आपण काही चांगल्या व्यवहाराचा देणे लागतो, म्हणून पण रंगभूमी सारखे त्यातले कलाकार खऱ्या जीवनात कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं संसारात चांगल्या मार्गाचे रंग भरत असतात त्यामुळे जीवनाला एक योग्य वळणच लागतं.


Rate this content
Log in