जी ले जरा
जी ले जरा
बास आता रडणं बंद कर. ज्याने तुझी कधीच कदर नाही केली सतत मनस्ताप दिला अशा माणसा साठी अश्रू ढाळू नकोस समू. चिन्मय समिता कडे आला होता आज तिच्या मिस्टरांना जाऊन महिना झाला होता . समिता मात्र अजून ही तिच्या दुःखात मग्न होती. या लग्ना ने तिला कुठलेच सुख नाही मिळाले नवरा तिच्या वर सतत संशय घ्यायचा तिने जास्त नटायचे नाही छान दिसायचे नाही. कोणा पर पुरुषा शी बोलायचे नाही . अशी खूप सारी बंधने तिच्या वर त्याने लादली होती. माहेरची परिस्थिती गरीब म्हणून ती कोणाला ही आपला त्रास सांगत नवहती. एक भाऊ होता त्याची ही जेमतेम परिस्थिती होती अजून तो अविवाहित होता. वडील तिच्या लहानपणीच गेले होते. आई ने कष्ट करून दोघांना मोठे केले. समिता बी ए पास होती पण नवऱ्याच्या स्वभावा मुळे तिला नोकरी करता नाही आली. चिन्मय तिचा बालमित्र तिच्या पेक्षा 5/ 6 वर्षांनी लहान पण दोघांची मैत्री छान होती नवऱ्याच्या अपरोक्ष ती चिन्मयशी बोलायची सगळं मनातलं सांगत राहायची तो ही तिला आधार देत असे. एकाच शहरात असल्याने कधीतरी चुकून त्यांची भेट व्हायची. पण नवऱ्याच्या भीतीने ती त्याला भेटायला घाबरत असायची. समू च्या लग्नाला बारा वर्षे झाली 2 मुल होती तीला. आहे या परिस्थितीशी जुळवून घेत जगत होती. नवरा तिचा ड्रिंक करायचा.. त्याला बी पी चा त्रास होता आणि स्वभाव असा कटकटी यामुळे एक दिवस हार्ट अँटक ने गेला.
समिता ची एकदाची त्या घुसमटीतुन सुटका झाली. समू आता स्वहताचा विचार कर. मुलांसाठी जग. भूतकाळ विसर आणि नव्याने जग. चिन्मय तिला समजावत होता. मी एकटी कसे सगळं मॅनेज करू रे मला काहीच माहिती नाही कधी घरा बाहेर या माणसाने सोडले नाही सतत सोबत असायचा सगळं तर तुला माहीत आहे चिनू . ती त्याला कधीतरी चिनू बोलायची लहानपणीची सवय. समू मी मोठा झालो आहे आता चिनू नको म्हणू ग. लहान असल्या सारख वाटत. समिता हसली तू तर आहेसच लहान. बघ हसताना छान दिसतेस अशीच हसत रहा. मी आहे काळजी नको करू आपण आधी तुज्या साठी नोकरी शोधू सगळं नीट होईल. मग चिन्मय ने त्याच्या मित्रांना सांगून तिला एके ठिकाणी जॉब मिळवून दिला. तिला नवीन कपडे घेवून दिले. चार लोकांत कसे वागायचे बोलायचे हे सांगितले.
समिता ही आता आनंदात होती मना सारख जगायला मिळणार होते तिला. नोकरी करू लागली तस तसा तिच्यात आत्मविश्वास येऊ लागला. स्वहता साठी जगणं काय असत हे समजू लागलं. चिन्मय अधूनमधून तिला भेटायचा. दोघ नाटकाला ,सिनेमा ला जायची कधी मुलांना घेऊन फिरायला जायची. अलीकडे तिला चिन्मय ची ओढ जाणवू लागली होती नकळतपणे ती त्याच्यात गुंतत चालली होती पण चिन्मय चे ही लग्न झाले आहे आपण असा विचार करणं चुकीचे आहे असं तिने स्वहताला बजावल. कुठेतरी चिन्मय च्या नजरेत तिला ही ती ओढ दिसायची पण चिन्मय ही तिला मैत्रीन या नात्यानेच बघत होता. एकदा सहज मस्करीत तिने त्याला विचारले चिन्मय मी तुला आवडते का रे? हो आवडतेस पण त्या आवडण्याला ही काही मर्यादा ही आहेत आणि त्या मी जाणून आहे. अस का विचारलेस पण मी काही विचित्र वागलो का तुझ्याशी? अरे तसे नाही सहज विचारले सॉरी .
ओके पण एक सांगू का समू.
"बोल"
माझं प्रेम आहे तुज्या वर पण मैत्रीण वर असते तसे आहे तुला काही ही मदत लागली तर मी आहे हे विसरू नकोस.
चिन्मय असा बोलला पण खरच तो समू वर प्रेम करत होता पण त्याला ही त्याची फॅमिली होती म्हणून तो गप्प होता. पण एक मित्र म्हणून कायम समिता ला सोबत करणार होता. समिता आता आनंदात राहत होती . इतके दिवस दडपना खाली जगत आली होती आता ती स्वतंत्र मुक्त आयुष्य जगत होती. एक दिवस तिच्या मैत्रिणीने तिला कॉलेज च्या व्हाट्स अँप ग्रुप वर ऍड केले तिथे मग सगळे जुने मित्र मैत्रीण भेटले गप्पा, कधी पार्टी कधी पिकनिक यांना जोर येऊ लागला. तिच्याच वर्गात असणारा साहिल त्याच्याशी समिता जास्त ऍटयाच झाली होती. त्याचा ही डिओर्स झाला होता. दोघे समदुखी होते त्यामुळे मनाने जवळ आले. साहिल ने समिताला लग्नाची मागणी घातली तिच्या दोन्ही मुलांची जबाबदारी ही तो घ्यायला तयार होता. चिन्मय ला समू बोलली की मी काय करु एकदा लग्नाचा डाव फसला होता आता पुन्हा ही रिस्क घेणं अवघड आहे. समू तू तुझ्या आयुष्याचा आता विचार कर . एकटीने तू किती दिवस काढनार कोणाची तरी सोबत हवी असते ग. आणि साहिल तुझा कॉलेजमेट आहे तर तू त्याला ओळखत असणारच ना . कसा वाटतो तो तुला? साहिल चांगला आहे रे यात शंका नाही . मग नक्की तू त्याला होकार दे. आणि मी आहेच कायम तुझा बेस्टी बनून राहीन. चिनू थँक्स ती हसत बोलली. तो ही हसला. समिता ने मग साहिल ला आपला निर्णय सांगितला. एका नवीन आयुष्याला ती सुरवात करणार होती. त्यात मनासारखे रंग भरणार होती. स्वहता साठी जगणार होती.
